नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विहीतगाव येथील हंडोरे मळा येथे राहत्या घरात विषारी सापाने चावा घेतल्याने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविता विजय हांडोरे (रा.समर्थ नगर,हांडोरे मळा) असे मृत महिलेचे नाव आहे. सविता हांडोरे या गेल्या शुक्रवारी (दि.७) दुपारच्या सुमारास आपल्या घरात साफ सफाई करीत असतांना अचानक त्यांना विषारी सापाने चावा घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पुतण्या प्रशांत हांडोरे यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या गुजराथी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.१२) डॉ.मानसी गुजराथी यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.