मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीत आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे मात्र याला शिष्टाचार म्हणत आहेत. शहांनी मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहांना दसऱ्याचे निमंत्रण
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल आठव्यांदा दिल्लीवारी केली. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिंदे राज्यात परतले आहेत. दिल्लीत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रात्री उशीरा भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शहा यांना शिंदेंनी निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या शिंदे गटाला एमएमआरडीएच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रॅलीला परवानगी मिळाली आहे.
शिंदे म्हणाले
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या गटांमध्ये सुरू असलेल्या वादावरही शिंदे आणि शहा भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटले की, ‘दिल्ली भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शिष्टाचार भेट झाली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कुणाला संधी
सत्तास्थापनेवेळी केवळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ जणांना संधी मिळाली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अद्यापही शिंदे गटात मोठे नाराजी नाट्य असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात नक्की कुणाला संधी मिळणार याची अनेकांना उत्सुकता आहे.
शुक्लांची भेट
एकनाथ शिंदे यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचीही भेट घेतली आहे. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या एडीजी म्हणून कार्यरत आहेत. आता या भेटीनंतर त्यांच्या मुंबईत परतण्याबाबत चर्चा वाढल्या आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबईत फोन टॅपिंग आणि कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी शुक्लांवर अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात धाव
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणाव शुक्रवारी संपुष्टात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मुंबई उच्च न्यायालयाने मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. या याचिकेविरोधात बंडखोर शिंदे गटाकडूनही अर्ज करण्यात आला होता. तो न्यायालयाने फेटाळला. आता शिंदे गटा उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली दौऱ्यावर असताना आज केंद्रीय गृहमंत्री श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.#delhi pic.twitter.com/t20cpmtl9A
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2022
Maharashtra Cabinet Expansion Amit Shah Green Signal
Politics Shivsena Rebel BJP
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/