साप्ताहिक राशिभविष्य – ४ ते ११ सप्टेंबर २०२२
मेष – विविध कारणांनी भूतकालीन आर्थिक अनुभव तसेच घटनांचा आढावा घेण्याचा या सप्ताहात प्रसंग असेल. जुन्या आर्थिक रेकॉर्ड तसेच आर्थिक अनुभव यावेळी आपणास उपयोगी पडतील…..
वृषभ – विविध कारणांनी हा सप्ताह लक्षात राहू शकतो. त्यामध्ये व्यवसायातील अचानक मोठा बदल किंवा नोकरीमध्ये मोठा बदल. अशा प्रकारच्या घटनांनी हा सप्ताह महत्त्वाचा ठरू शकतो…..
मिथुन – परिचितांनी दिलेले सर्व प्रकारचे कडू गोड अनुभव, त्यातून घ्यावा लागणारा भविष्यकालीन धडा, यामुळे हा सप्ताह लक्षात राहील. बरेचदा आपले म्हणणारे परके होतात तर परके आपले होतात…..
कर्क – व्यवसायिकांसाठी हा सप्ताह अतिशय लाभदायी आहे. व्यवसायात आपण केलेले नवीन बदल फायद्यात राहतील. व्यवसायाचे बदललेले स्वरूपही आकर्षक राहील….
सिंह – विविध कारणांनी करावा लागणारा प्रवास व त्यामुळे तब्येतीची झालेली हेळसांड याचा अनुभव या सप्ताहात येऊ शकतो. त्याकरता विशेष प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे…..
कन्या – या राशीचे ज्येष्ठ मंडळींनी घरातील अथवा परिचयातील तरुण व्यक्तींच्या मदतीने या सप्ताहात महत्त्वाची कामे पार पाडावी. मुख्यतः सरकारी कामे यात असतील…..
तूळ – खेळाडू तसेच कलाकारांसाठी हा सप्ताह विशेष महत्त्वाचा आहे. खेळाडूंनी केलेली मेहनत त्याचे फळ या सप्ताहात विविध रूपाने त्यांना मिळू शकते. तसेच कलाकारांना नवीन संधी मिळण्याचा योग यावेळी आहे…..
वृश्चिक – ज्याला आपल्या कर्तव्य तसेच भावनांची जाणीव आहे. अशाच व्यक्तीसाठी या सप्ताहात आपण मदतीचा पुढाकार घ्यावा. अन्यथा गैरसमज होण्याचा संभव आहे. आपल्याला कडू अनुभव दिलेल्या व्यक्तींपासून लांब राहावे…….
धनु – आपला विविध प्रकारचे कार्याची योग्य दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. त्याचा फायदा आपल्याला विविध रूपात होऊ शकतो. कार्य गौरव होईल…..
मकर – ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याच्या दृष्टीने या सप्ताहात विशेष काळजी घ्यावी. मुख्यपणे डोळ्यांचे तसेच घशाचे आरोग्याकडे या सप्ताहात लक्ष देणे विशेष आवश्यक आहे……
कुंभ – व्यक्तिगत शुभ घटना, कौटुंबिक शुभ प्रसंग अथवा नातेवाईक, परिचितांचे शुभ प्रसंग यास उपस्थित राहण्यात या सप्ताहात विशेष वेळ द्यावा लागेल….
मीन – अचानक मोठा आर्थिक व्यवहार या सप्ताहात करावा लागू शकतो. अशावेळी गडबडून न जाता अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने व्यवहार पूर्ण करावा….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत वास्तु रत्न हस्तरेषा कुंडली सेलेब्रिटी सल्लागार अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84