अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सवानिमित्त सगळीकडे जल्लोष असून प्रशासनाकडून हर घर तिरंगा उपक्रम राबविला जात आहे. मालेगाव प्रशासनाकडून प्रसिद्ध अशा गाळणे किल्ल्यावर मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम चा जयघोष करीत ग्रामस्थ, महसूल कर्मचारी यांनी अखंड ४०० मीटर तिरंगा ध्वज किल्यावर नेला. यावेळी किल्ल्यावरील स्तंभावर तिरंगा फडकविण्यात येऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.