नाशिक -भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०५ वाजता नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कळविले आहे.
ध्वजारोहण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांनी २० मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे, याबरोबरच नागरी शासकीय अधिकारी यांनी राष्ट्रीय पोषाखात तर गणवेषधारी अधिकारी यांनी नियमानुसार पोषाखात कार्यक्रमास उपस्थित रहावे, असेही विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.