मुंबई – भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी जॅग्वार लँड रोव्हर अपडेटेड व्हर्जन सादर करत आहे. कंपनीने नुकतेच वेलार आणि स्पोर्ट एसव्हीआर एसयूव्हीला सादर केले होते. आता Range Rover Evoque च्या नव्या अवताराला लाँच केले आहे. खूपच आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमतेमुळे एसव्हीयूची सुरुवातीची किंमत ६४.१२ लाख रुपये निश्चित केली आहे.
नव्या वेलारच्या धर्तीवर कंपनीने Evoque ला सुद्धा फक्त आर-डायनमिक एसई ्अवतारात लाँच केले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत कंपनीने इवोकला नव्या BS6 इंजिनासह अपडेट करून लाँच केले होते. त्या वेळी तिची किंमत ५९.८५ लाख रुपये होती. आताची Evoque गेल्या मॉडेलच्या तुलनेत खूपच महाग आहे.
या एसयूव्हीमध्ये काही विशेष आणि अत्याधुनिक फिचर्स दिसणार आहेत. कंपनीने याच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. डुअल-टोन अपहोल्सटरी पर्यायासह ही एसयूव्ही उपलब्ध आहे. यामध्ये अजूनही दिवसा सुरू राहणारे लाइट्स (DLR), स्लीक एलइडी हेडलँप, प्लश टाइप डोअर हँडल, टेपर्ड रुफालाइन आणि नवे रॅप अराउंड टेल लाइट्स एसयूव्हीच्या एरा ब्लॅक इन्सर्टशी जोडलेली आहेत.
एसयूव्हीचे इंटेरियर लेआउटसुद्धा पहिल्यासारखेच आहे. परंतु आता यामध्ये JLR च्या टच प्रो डुओ सिस्टिमऐवजी नवी आणि आधुनिक पीव्ही प्रो इंफोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
नव्या एसयूव्हीमध्ये ३-डी सराउंड कॅमेरा, वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि पीएम २.५ एअर फिल्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नव्या डीप गार्नेट/एबोनी डुअल-टोन अपहोल्स्ट्री हे महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय १२.३ इंचाचे पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल, हेड-अप डिस्प्ले, हिटेड आणि इलेक्ट्रिकली एडजस्टेबल फ्रंट सीट, पॉवर्ड टेलगेट, पॅनोरमिक सनरूफसुद्धा उपलब्ध आहे.
एसयूव्हीमध्ये दोन लिटर क्षमतेच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोल इंजिन २४७ बीएचपीची ऊर्जा आणि ३६५ एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. तर डिझेल इंजिन १७७ बीएचपीची ऊर्जा आणि ४३० एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. हे दोन्ही इंजिन ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्ससोबत येतात.