रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हुश्श! अनावश्यक कॉल्सपासून लवकरच मुक्ती; प्रत्येक कॉलला होणार तब्बल १० हजाराचा दंड

by India Darpan
जुलै 9, 2021 | 12:35 am
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली –  कार्यालयात काम करत असताना किंवा मीटिंगमध्ये असताना किंवा दुपारी आराम करत असताना अनेक कंपन्यांचे अनावश्यक कॉल किंवा मेसेज सर्वांनाच हैराण करत असतात. अनावश्यक कॉल्समुळे ग्राहक आणि कॉलर्सचे वादही होतात. दूरसंचार विभागाला (डीओटी) नागरिकांच्या तक्रारी मिळाल्यानंतर आता कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. अनावश्यक कॉल किंवा एसएमएस पाठविणार्या कंपन्यांविरोधात विभागाने दंडाची तरतूद केली आहे, अशी माहिती विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.
डीओटीतर्फे करण्यात आलेल्या नव्या तरतुदीनुसार, नियमांचे ५० दा उल्लंघन केल्यानंतर अशा कॉल्स आणि एसएमएससाठी १० हजार रुपयांचा दंड असेल. नियमांचे १० दा उल्लंघनासाठी प्रति उल्लंघन एक हजार रुपये, १० ते ५० उल्लंघनासाठी प्रति उल्लंघन ५ हजार रुपये आणि ५० हून अधिक वेळा उल्लंघन केल्यानंतर प्रति उल्लंघन दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
वाणिज्यिक संचारामध्ये ग्राहक अधिमान नियमावली २०१८ नुसार, दंडाची तरतूद शून्य ते १००, १०० ते १ हजार रुपये अशी केली आहे. त्याशिवाय डीओटीच्या डिजिटल गोपनीय विभागाच्या उपकरणाच्या स्तरावरही नियमांचे उल्लंघन करण्याचा तपास केला जाणार आहे.
दंडाची नवी तरतूद
– ० ते १० उल्लंघनावर १ हजार रुपये दंड
– १० ते ५० उल्लंघनावर ५ हजार रुपये दंड
– ५० हून अधिक वेळा उल्लंघनावर १० हजार रुपये दंड
फास आवळण्यासाठी कठोर तरतुदी
पुनर्सत्यापनानंतर सर्व क्रमांक डिस्कनेक्ट करण्यात येणार आहेत. त्यांच्याशी निगडित आयएमईआयना संशयास्पद क्रमांकाच्या यादीत टाकले जाईल. संशयास्पद यादीत सहभागी आयएमईआयसाठी ३० दिवसांच्या कालावधीत कोणतेही कॉल, एसएमएस किंवा डाटाला (इंटरनेट) मंजुरी नसेल. संशयास्पद यादीत नोंदविलेले आयएमईआय क्रमांकांच्या उपकरणाचा वापर करून नव्या क्रमांकावरून हैराण करणार्या कॉलरच्या कोणत्याही कॉल, एसएमएस किंवा डाटाला पुनर्सत्यापन करण्यास सांगितले जाईल.
दोन वर्षापर्यंत बंदी
पुनर्सत्यापणानंतर हैराण करणार्या कॉलरचा क्रमांक सक्रिय होऊन पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास नव्या कनेक्शनचा वापर सहा महिन्यांसाठी प्रतिदिवस २० कॉल आणि २० एसएमएस पर्यंतच मर्यादित राहणार आहे. त्यानंतरही उल्लंघन कायम राहिल्यास दूरसंचार कनेक्शन खरेदीसाठी वापरात येणारे ओळखपत्र आणि पत्त्याच्या कागदपत्रांवर दोन वर्षांपर्यंत बंदी आणली जाणार आहे.
असे आहेत कठोर नियम
– कॉलच्या उल्लंघनाचा तपास दूरसंचार विभागाचा डिजिटल गोपनीय युनिट करणार
– संशयास्पद क्रमांकाच्या सत्यापनासाठी एक सिस्टिम जनरेटेड मेसेज पाठविला जाईल
– पुनर्सत्यापन करताना क्रमांक बंद केला जाईल.
–  संबंधित आयएमआयला ग्रे यादीत टाकले जाईल
– अशा क्रमांकांवर ३० दिवसांपर्यंत मेसेज आणि कॉल करण्याची सुविधा नसेल
– ग्रे यादीत समावेश असलेल्या आयएमआय क्रमांकाचे मोबाईलचे दोनदा सत्यापन करावे लागेल
– सत्यापन केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यास मेसेजची संख्या कमी करण्यात येईल.
– अशा ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंत जास्तीत जास्त २० मेसेजच पाठवता येतील
– त्यानंतरही उल्लंघन सुरूच राहिल्यास दोन वर्षांपर्यंत ब्लॉक केले जाईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तब्बल ९ गिअर असलेली ही कार भारतात लाँच; अशी आहेत तिची वैशिष्ट्ये आणि किंमत

Next Post

याला म्हणतात दानत! जेफ बेझोसच्या माजी पत्नीने दान केले एवढे कोटी रुपये

Next Post
EhCwFevWAAEF1CB

याला म्हणतात दानत! जेफ बेझोसच्या माजी पत्नीने दान केले एवढे कोटी रुपये

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011