India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

७४ कोटी रुपयाच्या बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणारे रॅकेट उघडकीस

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in राज्य
0

मुंबई – केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणारे रॅकेट उघडकीला आणले आहे. 74 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा वापर सुमारे 14.4 कोटी रुपयांचे बनावट वस्तू आणि सेवा कर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी, बस्वार कंपनीच्या मालकाला 24.05.2022 रोजी अटक करण्यात आली. त्यानेच या कंपनीची स्थापन केली होती. तर, दुसऱ्या व्यक्तीला 26.07.2022 रोजी अटक करण्यात आली. ही व्यक्ती मालक असल्याचे भासवून बस्वार इंडस्ट्रीजच्या नावाने करंट बँक खाते उघडण्यात गुंतली होती आणि 18 कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले होते.

एका विशिष्ट स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने या आस्थापनाविरुद्ध तपास सुरू केला. तपासादरम्यान घोषित व्यवसाय पत्ता अस्तित्वात नसल्याचा आढळून आले तसेच कोणत्याही व्यावसायिक घडामोड झाली नसल्याचे आढळून आले. तपासात असेही समोर आले आहे की, या आस्थापनाने 7.20 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि 7.20 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट पास देखील केले होते.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा किंवा वस्तू न घेता, या कर क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि पास करण्यासाठी सुमारे 74 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या तयार करण्यात आल्या होत्या. या कर फसवणुकीत 126 पेक्षा जास्त व्यावसायिक संस्थांचे जाळे कार्यरत आहे, जे दिल्ली, अहमदाबाद, राजकोट, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांसह अनेक राज्यात पसरलेले आहे.

तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्याच्या आधारे आणि या कर फसवणुकीत त्याच्या भूमिकेची कबुली देणाऱ्या, आरोपी व्यक्तीला 26.07.2022 रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. आरोपीला माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास आणि कर वसुलीची कारवाई सुरू आहे.

हे प्रकरण केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या मुंबई क्षेत्रात कर फसवणूक करणारे आणि बनावट ITC नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात केलेली ही 9 वी अटक आहे. संभाव्य फसवणूक करणार्‍यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकारी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकारी, करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम येत्या काही दिवसांत अधिक तीव्र करणार आहेत.


Previous Post

वेटलिफ्टिंग खेळाडू आकांक्षा व्यवहारेचे मनमाडला स्वागत ( व्हिडीओ )

Next Post

भारताने घडविला इतिहास! वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत ३-० ने नमवले; हे आहेत विजयाचे ५ हिरो

Next Post

भारताने घडविला इतिहास! वेस्ट इंडिजला त्यांच्याच भूमीत ३-० ने नमवले; हे आहेत विजयाचे ५ हिरो

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group