नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचे वृत्त आहे. खासकरुन तुम्ही दर मध्य रेल्वेचे प्रवासी असाल तर तुमची गैरसोय होणार आहे. दक्षिण–पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या रेल्वेमार्गाशी संबंधित काम सुरू आहे. त्यामुळे तब्बल ६२ गाड्या येत्या ३१ ३१ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रेन क्रमांक १२१३०/१२१२९ हावडा-पुणे, १८१०९/१८११० टाटा-इतवारी, १२८१०/१२८०९ हावडा-सीएसएमटी , १२८३३/१२८०९/१२८०९ हावडा, अहमदाबाद-१२८०९/१२८०९ शालिमार कोलकाता रद्द होईल. तसेच १२२६२ हावडा-सीएसएमटी दुरांतो २२,२३, २४, २६ ऑगस्ट, १२२६२ सीएसएमटी – हावडा दुरांतो २३, २४, २५, २८ ऑगस्ट, १२२२२ हावडा-पुणे दुरांतो २०, २५, २७ ऑगस्ट, पुणे – १२२२ तसेच २९ ऑगस्ट, २२८४६ हटिया – पुणे २२, २६, २९ ऑगस्ट, २२८४५ पुणे – हटिया २४, २८, ३१ ऑगस्ट, १२८८० भुवनेश्वर -एलटीटी २२, २५, २९ ऑगस्ट, १२८७९ एलटीटी – भुवनेश्वर २४, २७, ३१ रोजी धावणार नाहीत. त्याचप्रमाणे २०८२२ संत्रागाछी-पुणे हमसफर एक्सप्रेस २०, २७ ऑगस्ट, २०८२१ पुणे – संत्रागाची २२ आणि २९ ऑगस्ट रोजी रद्द राहतील. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
आता गैरसोय, नंतर फायदाच फायदा
नागपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे इतवारी – नागभीड ब्रॉडगेज मार्गाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गाच्या कामात कांपा – चिमूर – वरोरा मार्गाचा समावेश करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे. कांपा – वरोरा दरम्यान रेल्वे मार्ग झाल्यास या संपूर्ण परिसराचे अर्थकारण बदलणार आहे. याशिवाय लगतच्या भागाचा झपाट्याने विकास होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांपा चिमूर वरोरा ब्रॉडगेजच्या कामाला तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याने चिमूर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सध्या कांपा- चिमूर- वरोरा भागात रेल्वे मार्ग अस्तित्वातच नाही. मात्र हा मार्ग झाल्यास वरोऱ्यावरून दक्षिणेकडे जाणारा मार्ग व नागभीडकडून हावडाकडे जाणारा मार्ग जोडल्या जाणार आहे. याच परिसर सर्वाधिक खनिज संपत्ती असल्याने हा परिसरातील समृद्धी वाढणार आहे. याशिवाय हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर खनिज प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन मिळणार आहे. ताडोबा पर्यटन स्थळाला येणाऱ्या पर्यटकांची वर्दळदेखील वाढणार असल्याने आर्थिक स्त्रोतांना चालना मिळणार आहे.
62 Railway Cancelled up to 31 August 2022
Nagpur Central East South Railway