सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमित शहांच्या या एका निर्णयाने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रालाच लागणार सुरूंग

by India Darpan
ऑगस्ट 22, 2022 | 3:06 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Amit Shah

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे मंत्रालय एका महत्त्वाच्या निर्णयाप्रत आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्रालाच सुरूंग लागण्याची चिन्हे आहेत. जिल्हा बँकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, या बँका लवकरच राज्य बँकेत विलीन होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्हा बँका या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. म्हणून या बँका राज्य बँकेत विलीन करण्याचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रातील सहकार खात्याकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली असून, विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रातील सहकार विभागाकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. सहकार विभागाच्या या अहवालावरच जिल्हा बँकांचे भवितव्य ठरणार आहे. पुढील तीन महिन्यात केंद्रातील सहकार विभागाकडून जिल्हा बँकांच्या विलिनिकरणाबाबत अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालाच्या अभ्यासानंतर जिल्हा बँका या राज्य बँकांमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे.

राजकारणालाही सुरूंग
राज्यातील जिल्हा सहकारी बँका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. जर, जिल्हा बँकांचे अस्तित्व राहिले नाही तर हे सर्व नेते अडचणीत येणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या सुद्धा शहा यांच्या या निर्णयाकडे पाहिले जात आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा शह देण्यासाठी जिल्हा बँकांवरच घाला घालण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातून जोरदार विरोध
मागील दहा वर्षांमध्ये अनेकदा जिल्हा बँका या राज्य बँकेत विलीन कराव्यात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु, या प्रस्तावाला राज्यातील अनेक सहकार क्षेत्रातील संस्था तसेच नेत्यांनी विरोध केला आहे. सध्या राज्यात असणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांची म्हणावी तेवढी स्थिती चांगली नसल्याचे वारंवार समोर येत आहे. राज्यातील मुख्य ३१ बँकांपैकी निम्म्याहून अधिक बँका या तोट्यात आहेत. या बँका तोट्यात असल्यामुळेच जिल्हा बँका राज्य बँकेत विलीन करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार विभागाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रातील सहकार विभागाकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

रिझर्व्ह बँकेकडून नवीन नियमावली 
जिल्हा बँकांच्या कारभाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक बँका सध्या तोट्यात आहेत. त्यामुळेच त्रिस्तरीय रचना ठेवण्यापेक्षा द्विस्तरीय रचना ठेवावी या विचारातून आता जिल्हा सहकारी बँका या राज्य बँकेत विलीन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्हा बँका या राज्य बँकेत विलीन करण्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून नवी नियमावली जारी करण्यात आली असून, आरबीआयच्या दिशानिर्देशनामुळे जिल्हा बँकांना अतिरिक्त अधिकार प्राप्त झाले आहेत.

Amit Shah Big Decision Maharashtra Cooperative Department
District Banks will Merge in State Banks
Banking Finance

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रवाशांचे होणार हाल; या ६२ रेल्वेगाड्या तब्बल ३१ ऑगस्टपर्यंत रद्द

Next Post

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची अशी जोरदार फिरकी (बघा व्हिडिओ)

Next Post
Capture 39

माजी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची अशी जोरदार फिरकी (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
fir111

बालकामगार नियुक्त करणे सोसायटीच्या महिला चेअरमनच्या अंगलट…गुन्हा दाखल

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011