इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपले शेजारी देश सध्या मोठ्या संकटातून आर्थिक संकटातून जात आहेत, श्रीलंकेप्रमाणेच पाकिस्तान मध्येही अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारवर प्रचंड प्रमाणात जागतिक बँकेचा कर्जाचा डोंगर असून त्यामुळे देशाचा राज्यकारभार चालविणे देखील कठीण झाल्याने विकास कामे ठप्प झाले आहेत.
त्याचवेळी एकीकडे पाकिस्तान आपला खर्च भागवण्यासाठी संघर्ष करत आहे तसेच या भागात पाकव्याप्त काश्मीरला देण्यात येणाऱ्या निधीतही कपात केली आहे. या कपातीमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीही बिकट झाली आहे. पण असे असूनही दुसरीकड पीओकेचे तथाकथित राज्यकर्ते त्यांच्या ऐशोआरामापासून परावृत्त होताना दिसत नाहीत. अलीकडेच, पीओके सरकारने 34 कोटी खर्च करून 72 नवीन आलिशान कार खरेदी केल्या आहेत. मात्र, या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.
एका अहवालात वृत्तसंस्थेने सांगितले आहे की, पीओके सरकारने अध्यक्ष बॅरिस्टर सुलतान महमूद यांच्यासाठी या सर्व आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. ही सर्व वाहने अशा वेळी खरेदी करण्यात आली आहेत जेव्हा पीओके सरकारचे मंत्री सतत पाकिस्तान सरकारने त्यांच्या बजेटमध्ये कपात केल्याच्या तक्रारी करत आहेत.
अहवालानुसार, पाकिस्तान सरकारने पीओकेच्या विकास बजेटमध्ये 2.5 अब्ज रुपयांची कपात केली आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाविरोधात नागरिक आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी आंदोलन केले आहे. काही तज्ज्ञांचे असेही मत आहे की अशा कठीण काळात याची गरज नव्हती कारण या निर्णयामुळे पीओकेची अर्थव्यवस्था आणखी कोलमडून पडू शकते. तथापि, पीओकेच्या अध्यक्षांच्या प्रवक्त्याने सांगितले की, वाहनांसाठी ऑर्डर मागील सरकारनेच केली होती.
विशेष म्हणजे या वाहनांमध्ये मर्सिडीज आणि मॅटिक सेडान सारख्या सर्व वाहनांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पीओके सरकारच्या नवीन आलिशान कार खरेदीच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. याआधी देखील स्थानिक मीडियाने असे वृत्त दिले होते की कारसाठी ऑर्डर पीओकेचे अध्यक्ष बॅरिस्टर सुलतान महमूद यांनी दिले होते.
सोशल मीडियावरही ही बातमी येताच नागरिकांनी आपला निषेध नोंदवायला सुरुवात केली. मकसूद या युजरने लिहिले की, पाकिस्तानमधील नागरिकांकडे विष खाण्यासाठी पैसे नाहीत, पण इस्लामाबाद ते मुजफ्फराबादपर्यंत चैनीची एकही संधी सत्ताधारी सोडत नाहीत. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी यात पक्षप्रमुख इम्रान खान यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
34 crore Luxurious car purchase budget economic crisis citizens angry