इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात अनेक देशांमध्ये बिटकॉइन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी हे आता अधिकृत चलन म्हणून स्वीकारण्यात येत आहे. तसेच काही देशांमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. सहाजिकच भारतात देखील या प्रकारच्या करन्सी संदर्भात नागरिकांना आकर्षण वाटते.
क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन असून ते वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी वापरले जाते. या चलनात क्रिप्टोग्राफी वापरली जाते. आपण ते प्रॉपर्टी म्हणून वापरू शकतो, परंतु यासाठी बँक, एटीएम असे काही नसते. जगातील बऱ्याच देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी ऑनलाईन शॉपिंगमध्ये वापरली जाते. क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन आहे. ते नोटा किंवा नाणी स्वरुपात छापता येत नाही, तरीही त्याला मूल्य आहे. आणखी एक चिंताजनक घटक म्हणजे ते परकीय चलनांवर व्यापारासाठी उपलब्ध होत आहेत, त्यामुळे व्यापार्यांचा शोध घेणे कठीण होत आहे.
अमेरिकेत यात अशाच प्रकारे एक मोठी फसवणूक झाली असून अमेरिकन एजन्सी एफबीआय रुजा इग्नाटोव्हाचा शोध घेत आहे. ज्याला जग ‘क्रिप्टो क्वीन’ या नावानेही ओळखते. एफबीआयच्या टॉप टेन फरारींच्या यादीत रुजा इग्नाटोवाचा समावेश आहे. रुजा इग्नाटोव्हा हिच्यावर OneCoin क्रिप्टोकरन्सीद्वारे लाखो गुंतवणूकदारांची 3.17 ट्रिलियन रुपयांची (सुमारे 4 अब्ज डॉलर्स) फसवणूक केल्याचा आरोप आहे. यूएस फेडरल ब्युरोने या बल्गेरियन महिलेवर 1 लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.
विशेष म्हणजे रुजा इग्नाटोवाचा शोध 2017 पासून सुरू आहे. ती शेवटची ग्रीसमध्ये दिसली होती. रुजा इग्नाटोव्हाने 2014 मध्ये OneCoin क्रिप्टोकरन्सी लाँच केली. त्यानंतर रुजा इग्नाटोव्हाने दावा केला की ते आगामी काळात बिटकॉइनची जागा घेईल. OneCoin लाँच केल्यानंतर, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये विकले आणि विकत घेतले जात होते.
या कंपनीने एका वेळी दावा केला होता की त्यांच्याकडे किमान 3 दशलक्ष गुंतवणूकदार आहेत. रुजा इग्नाटोव्हाने तिच्या इतर साथीदारांच्या मदतीने लोकांना आमिष दाखवून 2014 ते 2016 दरम्यान सुमारे 4 बिलियन डॉलर्स कमावले. मात्र OneCoin, इतर क्रिप्टोकरन्सीप्रमाणे, एक असुरक्षित आणि स्वतंत्र ब्लॉकचेन होते.
रुजा इग्नाटोव्हाने तिच्या साथीदारांसह एक खोटा व बनावट बाजार तयार केला. जेथे OneCoin क्रिप्टोकरन्सीद्वारे व्यवहार शक्य झाले. ही एक चेन स्कीमपेक्षा अधिक काही नव्हते. ज्यामध्ये गुंतवणूकदाराला OneCoin मध्ये गुंतवणुकीसाठी दुसर्या व्यक्तीला प्रोत्साहित करावे लागले.
रुजा इग्नाटोवा कोठे आहे हे अद्याप काहीही माहित होत नव्हते. सन 2019 मध्ये त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि सिक्युरिटीज फसवणूक या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मार्च 2019 रोजी, रुजा इग्नाटोव्हाचा भाऊ कॉन्स्टँटिन इग्नाटोव्हा याला लॉस एंजेलिस विमानतळावरून अटक करण्यात आली. त्याचवेळी रुजा इग्नाटोवाच्या आणखी एका साथीदाराला 2018 मध्ये थायलंडमधून अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही रुजा इग्नाटोवाचा शोध सुरूच आहे.
Ruja Ignatova missing 3 trillion fraud USA Prize Police Wanted