सोमवार, नोव्हेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

फडणवीसांच्या विश्वासू अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती; एकनाथ शिंदेंवर अंकुश ठेवण्यासाठी? चर्चांना उधाण

फेब्रुवारी 20, 2023 | 2:54 pm
in संमिश्र वार्ता
0
Mantralay

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महत्त्वाचे निर्णय रविवारी जाहीर केले. यातील पहिला म्हणजे आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांना मित्रा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, या नियुक्तीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परदेशी आणि सिंह हे दोन्ही अधिकारी फडणवीसांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अंकुश ठेवण्यासाठी फडणवीसांकडून या दोन्ही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना प्रवीणसिंह परदेशी त्यांचे अतिरिक्त सचिव होते. त्यावेळी त्यांच्या कार्यपद्धतीचे खूप कौतुक झाले. कुशल सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर २०२० मध्ये मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली करण्यात आली. मग ते केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. त्यामुळे परदेशी मोठ्या भूमिकेत राज्यात परततील असे सहा महिन्यांपूर्वी वाटले होते. मात्र असे झाले नाही. आता त्यांची नियुक्ती महाराष्ट्र इन्स्टीट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने या संस्थेची स्थापना केली आहे.

https://twitter.com/sachin_inc/status/1627547373693202432?s=20

ब्रिजेश सिंग सीएमओत
सध्या गृहरक्षक दलात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत असलेले ब्रिजेश सिंह आता मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून रुजू होत आहेत. ते आयपीएस अधिकारी असून त्यांच्या कार्यपद्धतीचेही बरेच कौतुक होत आले आहे. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी आणि प्रधान सचिव विकास खरगे यांच्या टीममध्ये त्यांचा समावेश असणार आहे.

परदेशींबाबत आश्चर्य
देवेंद्र फडणवीस यांच्या टीममधील सर्वांत विश्वासू अधिकारी म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे प्रवीण परदेशी पुन्हा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात महत्त्वाच्या जबाबदारीत रुजू होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र त्यांची नियुक्ती सरकारच्या एका संस्थेत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या नियुक्तीमागे मोठे राजकारण असल्याचेही बोलले जात आहे.

2 IAS Officers CMO Appointment Politics Allegation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीच रायपूरमध्ये खळबळ; EDचे १२हून अधिक काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे

Next Post

कांदां प्रश्नावर शेतक-याने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र; अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पाठवली ही पत्रिका

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
IMG 20230220 WA0178 e1676885914108

कांदां प्रश्नावर शेतक-याने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र; अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पाठवली ही पत्रिका

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011