सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याला अधिक पसंती मिळत आहे. त्याचवेळी, गेल्या काही महिन्यांत असे स्मार्टफोनही बाजारात आले आहेत, ज्यामध्ये 108 मेगापिक्सलचा (MP) प्राईमरी कॅमेरा दिला जात आहे. जर तुम्ही 108 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. खास म्हणजे अवघ्या २० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध अससेल्या बेस्ट फोनबद्दल आपण जाणून घेऊया.
Redmi Note 10 Pro Max
हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर 19,999 रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह चार रिअर कॅमेरे आहेत. यामध्ये 5 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळेल. याशिवाय फोनमध्ये 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5020mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे.
Realme 8 Pro
6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. हा फोन 6.4-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108-मेगापिक्सलच्या प्राथमिक सेन्सरसह, 8-मेगापिक्सल आणि दोन 2-मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. कंपनीने सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे.
Motorola Moto G60
मोटोरोलाच्या या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. 6 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे . या फोनचा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेशसह येतो आणि त्याचा आकार 6.78 इंच आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 6000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा प्राईमरी कॅमेरा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.