अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चहा हे बहुतांश भारतीयांना आवडणारा आवडणारे प्रिय आहे. सकाळी सर्वांना चहा लागतो तसेच काही जण दुपारी, सायंकाळी, अगदी रात्री सुद्धा चहा पितात. चहाच्या कपाला शक्यतो कोणी नाही म्हणत नाही, ( फक्त चहा न पिणारे सोडून) घरोघरी चहा बनतो. तसेच कोपऱ्यावरच्या टपरीवर, कॅन्टीनमध्ये इतकेच नव्हे तर मोठ मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देखील चहा मिळतो.
चहाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत कोरा चहा, आयुर्वेदिक चहा, स्पेशल चहा, साधा चहा, जनता चहा, कटींग चहा, दुधाचा चहा, बासुंदी चहा, स्पेशल गुळाचा चहा असे नवनवीन प्रकार चहामध्ये आढळून येतात. तसेच चहाला अमृततुल्य असे देखील म्हणतात, अर्थात अमृततुल्य हा शब्द पुणे शहरातून आला आहे. परंतु आता तो सर्व दूर महाराष्ट्रात पसरला आहे. जागोजागी चहाचे स्पेशल शाखा असलेले स्टॉल तथा हॉटेल दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने पुणेरी चहा, पंढरपुरी चहा, कोल्हापुरी चहा, सोलापूरी चहा, आमदार चहा, खासदार चहा, सरपंच चहा, उपसरपंच चहा, बागलाण चहा, येवलेकर चहा असे नानाविध प्रकार आढळून येतात त्यातच आपले स्टॉल आकर्षक करण्यासाठी व्यावसायिक वेगवेगळ्या युक्तीचा वापर करतात. यामध्ये टेबल खुर्च्या स्पेशल असतात, इतकेच नव्हे तर कप देखील आकर्षक असतात. कोणी मातीच्या मडक्याचा म्हणजे कुल्हडरचा देखील वापर करतात. परंतु आता नगर जिल्ह्यातील एका व्यवसाय केले चक्क सोन्याच्या कपातून चहा देण्याचे उपक्रम सुरू केल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पारनेर येथे प्रेमाचा चहा आता चक्क सोन्याच्या कपात मिळत आहे. ऐकून आर्श्चय कुणालाही वाटेल परंतु, हे खरेच आहे. अनेकांचे सोन्याच्या कपात चहा पिण्याचे स्वप्न असते. आता हे स्वप्न प्रेमाचा चहा प्यायला गेल्यावर सत्य होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच सर्वसामान्य ग्राहकाला सोन्याच्या कपात चहा प्यायला मिळत आहे. प्रेमाचा चहा, येवले चहा असे चहा व्यवसायातील ब्रॅंड आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल कायम लढवतांना दिसतात. मात्र, यावेळी तर चक्क लोकांना सोन्याच्या कपात चहा प्यायला मिळत आहे.
पारनेर येथील चहा विक्रेते स्वप्नील पुजारी यांनी ही आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. पुजारी यांच्या प्रेमाचा चहा या दुकानात सोन्याच्या कपात चहा ग्राहकांना दिला जातो. तब्बल पाच लाख रुपये किंमतीचे आणि १० तोळ्यांचे दोन कप ठेवण्यात आले आहेत. सोन्याच्या कपात चहा पिण्यासाठी ग्राहकांची पसंती लाभली आहे. या प्रेमाच्या चहाच्या दुकानाची चर्चा आता राज्यभर रंगली असून सोन्याच्या कपात आता प्रत्येकाला चहा पिण्याचा आनंद घेता येत आहे. राज्यभरातून ग्राहक या सोन्याच्या कपातील चहा पिण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे १० तोळ्याच्या सोन्याच्या कपामध्ये फक्त आणि फक्त दहा रूपयांमध्ये चहा पिता येणार आहे.
आता सोन्याच्या कपात चहा पिण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. १० तोळ्यांचे दोन कप चहा पिण्यासाठी दुकानात ठेवण्यात आले आहेत. सोन्याचे कप आणि प्रेमाचा चहा पिण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी सकाळपासूनच दुकानामध्ये दिसून येते. परंतु दुकानदाराला हे सोन्याचे कप जपून तथा सांभाळून ठेवावे लागत आहेत. अन्यथा एखाद्या दिवशी चोरटे सोन्याच्या कापावरच डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे.
10 Gram Golden Cup Tea Premacha Chaha
Ahmednagar Parner