मनमाड – मनमाड व परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपयोगी वस्तू देण्याचा आनंद सेवा केंद्राचा प्रयत्न आहे. अगोदर पाच अॅाक्सीजन मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यानंतर आता त्यात तीनने भर पडली.तर पाच मशीन भेट देण्याची घोषणा एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली.
या उपक्रमाची माहिती सोशल मीडियाद्वारे मिळाल्यानंतर मनमाडचे भूमिपुत्र व पुणे येथे वास्तवास असणाारे सीए नंदूभाऊ गुंदेचा यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्वरीत आनंद सेवा केंद्राशी संपर्क साधून एक मशीन भेट दिली. तसेच एक मशीन गुप्तदाता कडून देण्यात आली.आनंद सेवा केंद्राच्या सर्व कार्यकर्ता कडून आणखीन एक मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या तिन्ही मशीनचे सेवा अर्पण मनमाडचे मुख्याधिकारी मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमृत मित्र परिवारातर्फे आनंद सेवा केंद्रास एक मशीन भेट देण्याची घोषणा अमृत पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अजित सुराणा व चेअरमन डॉ.श्री सुनील बागरेचा यांनी केली. सुरेश लोढा यांनी लोढा परिवार व सराफ सुवर्णकार असोसिएशन तर्फे ३ मशीन भेट देण्याची घोषणा केली. संदीप सुभाष संकलेचा यांच्यातर्फे ही आनंद सेवा केंद्रास एक मशीन भेट देण्यात आले. जनश्रद्धा फाउंडेशनच्या संचालिका सौ स्वाती नरेश गुजराती यांच्याकडून एका मशीन मदत करण्यात आली.
याप्रसंगी समर्पण ग्रुपने मनमाडकरांच्या सेवेसाठी सहा मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल राकेशभाऊ ललवाणी चेतनभाऊ संकलेचा, अनिषभाऊ हिरण व समर्पण ग्रुपचा मुख्याधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जैन एकता ग्रुपने मनमाडकराच्या सेवेसाठी सहा ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेदेखील याठिकाणी अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उद्योजक अजित सुराणा, नामकोचे संचालक सुभाष नहार, अमृत पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुनील बागरेचा, जनश्रध्दाचे नरेश गुजराथी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सुरेश लोढा, शांतीलाल गांधी, नंदलाल बेदमुथा, नानाभाऊ पाटील, संदीप संकलेचा, जितेंद्र चोरडिया, संतोष धांदल, डी.एम. व्यवहारे, भिकचंद नाबेडा, रामु जैन, परेश भंडारी,अमोल देव, विनय सोनवणे, नितीन आहेरराव ,ललित धांदल अनुप पांडे ,योगेश भडके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आनंद सेवा केंद्रातर्फे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष योगेश भंडारी यांनी केले. ऑक्सीजन मशीन ची आजच्या परिस्थितीमध्ये प्रचंड आवश्यकता असून दानशूर व्यक्तीने पुढे येऊन या कार्यास मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.