नाशिक – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे नाशिक शहर व जिल्हा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठक सुरू आहे.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पांडेय, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त डॉ.माधुरी पवार, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखिल सैंदाने, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित आहेत.