नाशिक – नाशिकमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी डोके वर केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानाची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेला देणाऱ्या दीपक शिरसाठ (वय ४१) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ओझर येथील हिंदुस्थान एआरोनॉटिक्स लिमिटेडचा तो कर्मचारी आहे. तो सतत आयएसआय च्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, एटीएसच्या नाशिक युनिटने शिरसाठला अटक केली आहे. तो पाकिस्तानातील इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या संस्थेच्या सतत संपर्कात होता. अत्यंत गोपनीय आणि देशाच्या संरक्षणाशी संबंधित माहिती तो पुरवित होता. शिरसाठ हा एचएएलचा कर्मचारी असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आहे. एचएएल मधील लढाऊ विमानाची गोपनीय माहिती, फोटो व अन्य बाबी तो आयएसआयला देत होता. ओझर एचएएलचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र आहे. तेथेच असा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या आरोपीकडून एटीएसच्या पथकाने ५ सिमकार्ड, ३ मोबाईल हँडसेट आणि २ मेमरी कार्ड जप्त केले आहेत. हे सर्व फॉरेन्सिक विभागाला पाठविण्यात आले आहेत. त्याची तपासणी सुरू आहे. शिरसाठला कोर्टापुढे हजर केला असता १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एटीएसचे अतिरीक्त पोलिस महासंचालक देवेन भारती, महासंचालक जयंत नाईनवरे, रविंद्रसिंग परदेशी, पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड, एसीपी सुनिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नरीक्षत महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप घुगे, प्रतिमा जोगळेकर, हेड कॉन्स्टेबल संपत जाधव, प्रमोद उबाळे, गोविंद जाधव, संजय भुसाळ, विलास वाघ, दिपक राऊत व सुदाम सांगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.
आणखी संबंधित बातम्या
- इंडिया दर्पण विशेष लेख – निसर्ग रक्षणायन – हेरगिरीची पाळंमुळं!
- HAL ने घेतली गंभीर दखल; हा घेतला निर्णय
– देवळाली कॅम्पमध्ये हिरगिरीकरुन पाकिस्तानला फोटो पाठविणाऱ्यास पोलिस कोठडी