नाशिक – देवळाली कॅम्प परिसरात हेरगिरी करुन पाकिस्तानला फोटो पाठविणाऱ्या परप्रांतीय हेरास नाशिक न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून काही महत्त्वाच्या बाबी त्यात समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
देवळाली कॅम्प स्कूल ऑफ आर्टिलरीच्या सैनिकी रुग्णालय परिसरात एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून रोजंदारीवर काम करीत होता. हेरगिरी करण्याच्या संशयावरुन देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याचे नाव संजीव कुमार (वय २१) असे आहे. गेल्या शनिवारी (३ ऑक्टोबर) सकाळी गेटवरील लष्करी जवानांनी सदर मजुराची तपासणी केली. त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागाचा फोटो दिसून आला. विशेष म्हणजे, हा फोटो पाकिस्तानातील एका व्यक्तीला व्हाट्सॲपवर पाठविण्यात आल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तात्काळ संशयितास ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी संपल्याने त्यास न्यायालयासोर हजर करण्यात आले. त्याची कसून चौकशी सुरू असून अद्याप ती पूर्ण न झाल्याचे पोलिसांनी न्यायालयालात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने आणखी ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आणखी संबंधित बातम्या
- इंडिया दर्पण विशेष लेख – निसर्ग रक्षणायन – हेरगिरीची पाळंमुळं!
- HAL ने घेतली गंभीर दखल; हा घेतला निर्णय
- खळबळजनक. पाकिस्तानला माहिती देणाऱ्या HAL च्या कर्मचाऱ्याला अटक
- https://indiadarpanlive.com/?p=11013