नाशिक – नाशिक कारखान्यातील कर्मचाऱ्याकडून पाकिस्तानच्या आयएसआयशी झालेल्या हेरगिरीप्रकरणाची हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) गंभीर दखल घेतली आहे. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) महाराष्ट्रच्या या कारवाईनंतर एचएएलच्या बंगळुरू या मुख्यालयातही खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याचे लवकरच निलंबन होणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचएएलच्या अध्यक्षांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली. त्यात त्यांनी यावर चर्चा केली. अटक करण्यात आलेला दीपक शिरसाठ हा आरोपी एचएएलच्या नाशिक कारखान्यात २००४ पासून कार्यरत होता. तो इंजिनिअर नाही. कारखान्यातील प्रशासकीय कार्यालयाचा तो कर्मचारी आहे. तरीही तो एवढे मोबाईल कसे बाळगत होता आणि त्याने कुठली गोपनीय माहिती आयएसआयला दिली या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
सध्या महाराष्ट्र एटीएसकडे शिरसाठचा ताबा आहे. न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्याने एटीएसकडून त्याची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीस एचएएलकडून पूर्णतः सहकार्य केले जाणार असल्याचे एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इंडिया दर्पण’शी बोलताना सांगितले आहे. सध्या तरी या कर्मचाऱ्याची एचएएलकडून स्वतंत्र चौकशी होणार नाही. एटीएसची चौकशी पूर्ण झाल्यानंतर एचएएल चौकशी करणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
आणखी संबंधित बातम्या
- इंडिया दर्पण विशेष लेख – निसर्ग रक्षणायन – हेरगिरीची पाळंमुळं!
- खळबळजनक. पाकिस्तानला माहिती देणाऱ्या HAL च्या कर्मचाऱ्याला अटक
- https://indiadarpanlive.com/?p=11013
- देवळाली कॅम्पमध्ये हिरगिरीकरुन पाकिस्तानला फोटो पाठविणाऱ्यास पोलिस कोठडी
- https://indiadarpanlive.com/?p=11045