India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्वत: च्या प्रयत्नातून कौशल्य विकसित करा; लेफ्टनंट कर्नल पी.एस. कृष्णा यांचे प्रतिपादन

India Darpan by India Darpan
August 18, 2020
in स्थानिक बातम्या
0

नाशिक – आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थीनी शॉर्टकटचा अवलंब करू नये. संदर्भ म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग जरुर करावा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाला स्वतःचे प्रयत्न जोडून अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणाचीही कॉपी करु नका, स्वतःच्या प्रयत्नाने आपली कौशल्ये विकसित करा आणि स्वत: अनुभव घेत ज्ञान मिळवा.  भविष्यातील आत्मनिर्भर भारत तुमच्या हातूनच घडणार आहे, अशा प्रेरणादायक विचारांनी लेफ्टनंट कर्नल पी एस कृष्णा यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. केंद्रीय विद्यालय, तोफखाना केंद्र, नाशिकरोड कॅम्प मध्ये आयोजित ७४ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कृष्णा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महात्मा गांधी, प्रख्यात वैज्ञानिक एडिसन इत्यादींचे रोचक प्रसंग त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनची थीम लाईन आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर सुंदर विवेचन केले. तसेच  नवीन शैक्षणिक धोरणाच्या महत्वावर ही चर्चा केली. कोविड -१९ संक्रमण प्रभावामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले गेले नाही, ऑनलाइन वर्गांमधूनच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य समारंभ अनुभवता आला.  शिक्षकांच्या समूहाने “ये है नया हिंदुस्तान” या गाण्याचे सुंदर सादरीकरण केले. प्राचार्य  देवेंद्रकुमार ओलावत यांनी अतिथींचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या काळातही केंद्रीय विद्यालय आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या व सहज पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत कोणताही खंड पडणार नाही, याची काळजी घेत आहे.
सूत्रसंचालन शिक्षक आरिफ बेग यांनी केले तर उपप्राचार्या अंजू कृष्णानी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  महादेव बारब्दे, महेंद्र महाजन, राजेंद्र त्रिवेदी, रोहित गौड, जी.क्यू. उस्मानी, अमृत बागुल, अलका बंड, सोज्ज्वल मांडवगणे, नंदिनी भगत, निमिषा सिंग,  मोनिका, पूजा दहिया, गीता, खुशनुमा, विजय पाटील, संतोष खडगीर, प्रवीण शिंदे, जितेंद्र सिंह, संदीप कुमार, अथर्व कडभाणे आदींनी परिश्रम घेतले.

Previous Post

हो, आता एसटी महामंडळाचा पेट्रोल पंप; इंडियन ऑईल सोबत सामंजस्य करार

Next Post

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा; या सहा जिल्ह्यांना निर्देश

Next Post

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा; या सहा जिल्ह्यांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group