मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील तब्बल १२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यात पवार यांच्या पाच सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. मात्र, पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना बाधा झालेल्यांमध्ये स्वयंपाकी महिला आणि ड्रायव्हर यांचाही समावेश आहे. मात्र, बाधितांकी कुणीही पवार यांच्या संपर्कात आले नव्हते, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पवार हे आगामी काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याचे सांगितले जात आहे.