नाशिक – मराठा आरक्षण लढा व मराठा समाज मागण्यांबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने सीबीएस जवळील शिवाजी पुतळ्याच्या ठिकाणी जागर गोंधळ आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्षपदावरुन मंत्री अशोक चव्हाण यांना दूर करावे, मराठा समाज आरक्षण, व मागण्यासाठी २ दिवसीय विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे, सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी न घेता ती न्यायालय पूर्णपणे सुरु झाल्यावर घ्यावी, असा आग्रह राज्य सरकारने धरावा, अशा विविध मागण्यांंचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, राजू देसले, संदीप शितोळे निलेश मोरे योगेश कापसे, शरद तुंगार, विजय खरजुल, ज्ञानेश्वर थोरात, सचिन पवार, धानेश्वर भोसले आदी उपस्थित होते.