India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

संकटकाळातील शैक्षणिक प्रगतीबद्दल नंदुरबारचे कौतुक

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in राज्य
0

नीती आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर गौरव

नंदुरबार – कोरोनासारख्या संकटाचा सामना करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात येणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे नीती आयोगाने कौतुक केले आहे. आकांक्षित जिल्ह्याच्या फेब्रुवारी ते जून या कालावधीतील शैक्षणिक प्रगती संदर्भात देशातील आकांक्षित जिल्ह्यापैकी नंदुरबारचा चौथा क्रमांक आला आहे.

विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थलांतर, बालरक्षक कार्यशाळेचे आयोजन, शिक्षण हमी कार्ड वितरण, मुलींना उपस्थिती भत्ता देणे व मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटपात जिल्ह्याने चांगली कामगिरी करीत  प्राथमिक ते उच्च प्राथमिक वर्गात ९९.५९ गुण तर उच्च प्राथमिक ते माध्यमिक वर्गात ९३.३३ गुण मिळविले आहेत.

गुणवत्ता वाढीसाठी

आंकाक्षित जिल्हा अंतर्गत ६२ शाळांना ६५ स्वच्छतागृह मंजूर करून पुर्ण करण्यात आले आहेत. एनएएसच्या धर्तीवर प्रत्येक ‍जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांकडून भाषा आणि गणित विषयासाठी सराव चाचणी घेण्यात आली आहे. तसेच केंद्र स्तरावरील शिक्षण परिषदेत गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रथम फाऊंडेशन, ग्यान प्रकाश, पिरॅमल फाऊंडेशन व कराडीपाथ आदी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने गुणवत्ता वाढीचे उपक्रम शाळांमधून राबविण्यात येत असून त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती मिळणे शक्य झाले आहे.

साक्षर उपक्रमाला यश

जिल्ह्यात निरंतर शिक्षण विभागाकडून साक्षर भारत उपक्रम राबविण्यात आला. त्यात १ लाख १७ हजार  निरक्षर स्त्री-पुरुषांना साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण देऊन परिक्षेचे आयोजन करण्यात आले. त्यात १ लाख ६ हजार नवसाक्षरांची संख्या वाढली असून त्यात ५५ हजारपेक्षा अधिक महिला आहेत. शाळेला नळ कनेक्शन किंवा हातपंपाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे व विद्युत सुविधा असणे आदी बाबींचाही गुणांकनामध्ये समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होत असून त्याला नीती आयोगाने ट्टिवटच्या माध्यमातून केलेल्या कौतुकामुळे अधिक वेग मिळणार आहे.


Previous Post

मुंबईत आतापर्यंत ८६ हजार ३८५ रुग्ण कोरोनामुक्त

Next Post

राममंदिराचे भूमिपूजन नंतर करा

Next Post

राममंदिराचे भूमिपूजन नंतर करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group