India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शहरात वाहनचाेरीचे सत्र सुरूच

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक : शहरात वाहनचोरट्यांचा धुमाकूळ कायम असून, विविध उपनगरांमधून सर्रास वाहने लंपास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहराच्या तीन भागांतून तीन वाहनांची चोरी झाली आहे. या प्रकरणी सातपूर, अंबड व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर कॉलनीतील आनंद छाया बसथांबा परिसरात राहणारे छबुराव भिकाजी साळुंखे (रा.स्वरूप विद्या अपा.) यांची तवेरा एमएच ०४, एफझेड ६०८८ मंगळवारी (दि.२८) चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरी घटना सिडकोत घडली. साईबाबानगर भागात राहणारे पवन बापू पारधी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पारधी यांची मालवाहू रिक्षा एमएच १५, बीजे ४९८६ मंगळवारी (दि.२८) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत. तर पेठ रोडवरील शाहूनगर भागात राहणारे अमित शिवकुमार सोनी शनिवारी (दि.२५) कामानिमित्त गोदाघाटावर गेले होते. रामकुंड परिसरातील साईमंदिराजवळ पार्क केलेली त्यांची बॉक्सर एमएच १५, एटी ८१९८ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार ढुमसे करीत आहेत.

 


Previous Post

नाशिकमध्ये शनिवारपासून मॉल सुरू होणार

Next Post

बाल्कनीतून तोल जाऊन दोनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

बाल्कनीतून तोल जाऊन दोनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंबड पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

June 8, 2023

तब्बल ११ दुकाने फोडणारा जेरबंद… नाशिक पोलिसांची कामगिरी… या गुन्ह्यांची उकल

June 8, 2023
प्रातिनिधिक फोटो

मोबाईल चोरणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी लावला छडा…. तिघे गजाआड… ४० मोबाईल हस्तगत…

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने घेतला गळफास… सातपूर परिसरातील घटना

June 8, 2023

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; बघा, तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

नव्या पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांवर काय लिहायचं? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group