India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विक्रमी अन्नधान्य वाटप

India Darpan by India Darpan
August 16, 2020
in व्यासपीठ
0

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने गेल्या पाच महिन्यात विक्रमी अन्नधान्याचेवाटप केले आहे. सामान्य परिस्थितीमध्ये
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३.५० लाख मेट्रिक टन धान्य वितरीत केले जाते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी असूनही आहे त्याच यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३.५० लाख मे. टन मोफत तांदूळाचे वितरण करण्यात आले. मे आणि जून पासून केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त १.५० लक्ष मे. टन धान्य वाटप केले जात आहे. प्रति माह जवळपास ८.५० लक्ष मे. टन म्हणजे तीनपट धान्य वितरीत करण्याचा विक्रम केला आहे.
– छगन भुजबळ (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री)
माहे मार्च २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून ३६ लाख २१ हजार ७८४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप,  माहे एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून ३६ लाख ६१ हजार ६१७ क्विंटल अन्नधान्याचे वाटप व  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ३१ लाख ५१ हजार ९२६ क्विंटल वाटप केले.
माहे मे २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून ३६ लाख ९२ हजार १६४ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ३१ लाख ७३ हजार २९६ क्विंटल वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत डाळ ९७ हजार २९ क्विंटल वाटप, एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना ८ लाख २६ हजार ३८१ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, आत्मनिर्भर भारत योजनेमधून  मोफत तांदूळ १ लाख २१ हजार १६६ क्विंटल वाटप.
माहे जून २०२० मध्ये  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ,एपीएल  शेतकरी योजनेमधून  ३६ लाख ५४ हजार ३४९ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ३२ लाख १ हजार ६६ क्विंटल  वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत डाळ २ लाख, ९३ हजार, ११० क्विंटल वाटप, एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना ४ लाख ७७ हजार, ६६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, आत्मनिर्भर भारत योजनेमधून मोफत तांदूळ १४ हजार, ३३९ क्विंटल वाटप. माहे जुलै २०२० मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना एपीएल  शेतकरी योजनेमधून  ३७ लाख, ३४ हजार ६८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत तांदूळ ११ लाख ५४ हजार, ११२ क्विंटल वाटप. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमधून मोफत गहू १४ लाख ६५ हजार, ८७ क्विंटल वाटप करण्यात आले आहे. ऑगस्ट मध्ये हे विक्रमी अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या सुरूच आहे.
          राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या ३ कोटी ८ लाख एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत अल्पदरात धान्य. केंद्र शासनाकडून २१/- रु.किलो दराने घेतलेले गहू रु. ८/- प्रति किलो तर २२/- रु.प्रति किलो दराने घेतलेले तांदूळ १२/- रुपये प्रति किलो या दराने वितरीत. प्रतिमाह प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ तसेच प्रति कुटुंब एक किलो तुरडाळ किंवा चनाडाळ वितरण करण्यात येत आहे.आत्मनिर्भर योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत प्रति व्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण सुरू आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे रब्बी हंगामातील ज्वारी व मका या भरड धान्याची हमी भावामध्ये खरेदी. या योजनेचे उद्दिष्टे २.५० लाख क्विंटल वरून ९ लाख क्विंटल वाढवण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून २.५० लाख क्विंटल अतिरिक्त उद्दिष्ट वाढवून योजनेच्या मुदतीत दि. ३१ जुलै पर्यंत वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली रब्बी पणन हंगामात गहू या पिकासाठी राज्यात प्रथमच विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यात आली.
शिवभोजन
२६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबई मध्ये आणि प्रत्येक जिल्हा मुख्यालय ठिकाणी पालकमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते महाविकास आघाडीच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार. दररोज एक लाख थाळी उपलब्ध करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब,शेतकरी,मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याची सुविधा  सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेतून जवळपास दीड कोटी गरीब व गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
(शब्दांकन – दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबई)

Previous Post

चांदवडला गोपाल कृष्ण मंदिरात रंगला जन्मोत्सव

Next Post

राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

Next Post

राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक…..दिडोंरीत बलात्काराच्या गुन्हात अटक असलेला आरोपी नाशिकमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला.. बघा…नेमकं काय घडलं

September 29, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीचे महत्त्व

September 29, 2023

दिंडोरी तालुक्यात शाळेच्या आवारात झालेल्या गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम वादात, शिक्षणमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group