India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लालपरी धावणार. परजिल्ह्यातील वाहतुकीस परवानगी. नवीन सीबीएस, महामार्ग स्टँडवरुन सेवा

India Darpan by India Darpan
August 20, 2020
in राज्य
0

मुंबई – एसटी महामंडळाने राज्यांतर्गत परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात सेवा सुरू होणार आहे. प्रत्येक बसमध्ये केवळ २२ प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर मास्कही बंधनकारक असणार आहे.

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी व्यक्त केली आहे.

परब म्हणाले की, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्प्याटप्प्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही.  प्रवासात प्रवाशांनी  कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना  सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.

२२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली  आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना  सुरक्षित प्रवासी सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड – १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परब यांनी यावेळी केले.

नाशिक शहराला काही तालुक्यांना जोडणारी सेवा सुरू करण्यात आली. त्यास प्रतिसाद मिळाल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली. मात्र जिल्हाबंदी असल्याने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यासाठीची एसटी बससेवा बंद होती. आता ती सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी (१९ ऑगस्ट) घेतला आहे. सर्व बसेस निर्जंतुकीकरण केल्यानंतर चालविल्या जातील. प्रवाशांना मास्क बंधनकारक असेल तर एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी राहतील, असे नाशिक विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे नवीन सीबीएस आणि महामार्ग बसस्थानकावरुन पुणे, मुंबई, औरंगाबाद, धुळे, कसारा, बोरिवली या शहरांसाठी सेवा गुरुवारपासून (२० ऑगस्ट) सुरू केली जाणार असल्याचे मैंद यांनी सांगितले आहे.

 


Previous Post

पती दुबईत व पत्नी नाशिकमध्ये, कौटुंबिक न्यायालयाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घटस्फोटचा निर्णय

Next Post

दिलासा. ६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना दिली याची परवानगी

Next Post

दिलासा. ६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना दिली याची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग

February 2, 2023
प्रातिनिधीक फोटो

शेकोटीवर शेकत असतांना भाजल्याने २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू

February 2, 2023

नागपूर विधान परिषद निवडणुकीत या उमेदवाराचा विजय जवळपास निश्चित; पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group