त्र्यंबकेश्वर – गणपतीच्या मागोमाग लक्ष्मीच्या पावलांनी जेष्ठा-कनिष्ठांचे आगमन झाले आहे. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव नसल्याने घराघरात गणेशमुर्तींची स्थापना आणि सजावट यावर अधिक भर दिलेला दिसतो. महालक्ष्मीची आरास देखील अधिक उत्साहाने केली जात आहे. येथील रेंद्र पेंडोळे आणि कुटुंबाने महालक्ष्मीची आरास अत्यंत मनमोहक पध्दतीने केली आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.