India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रुरबन मिशनमध्ये जिल्ह्यातील या तीन गावांची निवड; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

India Darpan by India Darpan
August 14, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

नाशिक –  रुरबन मिशन अंतर्गत मालेगाव तालुक्यातील दाभाडी, त्र्यंबकेश्वर येथील निरगुडे आणि नांदगाव येथील मांडवड गावांची निवड करण्यात आली आहे. दाभाडी क्लस्टर साठी ३० कोटी, निरगुडे आणि मानवड क्लस्टर साठी प्रत्येकी १५ कोटी मंजूर झाले आहेत. परंतु मांडवड आणि नांदगांव या दोन्ही तालुक्यांच्या मंजुरी उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या योजनेतंर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी मुदतवाढ घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृह येथे राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत आयोजित शिखर समितीच्या आढावा बैठकित पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्प संचालक उज्वला बावके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, मधुकर मुरकुटे, गणेश चौधरी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील गावांच्या समुहांचा आर्थिक, सामाजिक,भौतिक विकास करण्यात येत असतो. या योजनेसाठी ६० टक्के निधी केंद्र शासनाचा व ४० टक्के निधी राज्य शासन देणार असल्याने सर्व योजनांमध्ये योग्य ताळमेळ ठेवून कामे मार्गी लावावीत अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.
रुरबन योजनेतंर्गत झालेल्या कामांची माहिती देत असतांना प्रकल्प संचालक उज्वला बावके यांनी ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध करुन त्यामध्ये रोजगार निर्मिती, मुलभूत सोयी-सुविधा आणि शहरासारख्या सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश असल्याचे सांगितले. या योजनेतंर्गत ५० टक्के आर्थिक बाबींवर, २० टक्के सामाजिक तर ३० टक्के मूलभुत बाबींचे कामे करण्यात येत असतात. दाभाडी, निरगुडे व मांडवड या गावात रुरबनच्या झालेल्या कामांची माहिती दिली. तसेच मालेगांव येथील दाभाडी क्लस्टरची कामे दुसऱ्या टप्प्यांवर असून मांडवड आणि निरगुडे क्लस्टरची कामे तिसऱ्या टप्प्यावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Previous Post

ग्रामविकासच्या त्या प्रस्तावास मंत्री हसन मुश्रीफ यांची तातडीने एका दिवसात मंजुरी

Next Post

नाशिकचा स्वातंत्र्य दिन सोहळा फेसबुकपेजवर लाईव्ह

Next Post
सिन्नर तालुक्यातील शिक्षिकेने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेले हे फलक लेखन

नाशिकचा स्वातंत्र्य दिन सोहळा फेसबुकपेजवर लाईव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिसऱ्या श्रावण सोमवारी बम बम भोलेच्या गजरात दुमदुमली त्र्यंबकनगरी

August 15, 2022

अंकाई किल्ल्यावर तिस-या श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी (व्हिडीओ)

August 15, 2022

मुंबई मेट्रोच्या या मार्गावरही मिळणार आता सेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

August 15, 2022

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-१५ः राजकीय कारकीर्द

August 15, 2022
प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! न्यायालयाच्या आवारातच संतप्त पतीने बायकोचा चिरला गळा

August 15, 2022

राजू श्रीवास्तव यांच्या MRI रिपोर्टमधून तब्येतीविषयी मोठा खुलासा

August 15, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group