India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रुग्ण बरे होण्याचा दर ६३ टक्के

India Darpan by India Darpan
July 23, 2020
in राष्ट्रीय
0

१९ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांमधील स्थिती

नवी दिल्ली ः एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे २८ हजार ४७२ रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय गेल्या २४ तासात बरे झालेल्या/ घरी सोडण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यासह, बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता ७ लाख ५३ हजार ४९ इतकी आहे. यामुळे कोविड-१९ रूग्णांमधील बरे होण्याचा दर ६३.१३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे सक्रिय रुग्ण संख्येत (४ लाख ११ हजार १३३ आजची संख्या) ३ लाख ४१ हजार ९१६ पर्यंत फरक पडला आहे. हा फरक उतरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचे निदर्शक आहे. राष्ट्रीय पातळीवर रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला असताना १९ राज्ये/ केंद्र शासित प्रदेशामधील हाच दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

बरे झालेल्या रुग्णांची सातत्याने वाढती संख्या, तसेच सक्रिय व बरे झालेल्या रूग्णांमधील वाढता फरक, या गोष्टीची साक्ष देतात, की केंद्राने अवलंबलेली व राज्य/ केंद्र शासित प्रदेश सरकारांनी राबवलेली धोरणे इच्छित परिणाम साधत आहेत. घरोघरी केलेले सर्वेक्षण, देखरेख ठेवणे, प्रभावी नियंत्रण योजना, असुरक्षित लोकांची तपासणी व विस्तारीत प्रसार-चाचणी यांच्या माध्यमातून बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. तीन-स्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा व उत्तम प्रकारे अंमलात आणलेल्या काळजी घेण्याच्या नियमावलीने रुग्णालय तसेच गृह-विलगीकरण यांच्याद्वारे प्रभावी उपचारांना मदत झाली आहे.

एम्स, नवी दिल्लीने, राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांमधील उत्कृष्ट केंद्रांच्या सहाय्याने अति दक्षता विभागामधील रूग्णांचे उपचार करण्यास व काळजी घेण्यास मदत केली आहे; ज्यायोगे भारतात कोविड रुग्णांचे प्रमाण कमी राखणे शक्य झाले आहे. एम्स, नवी दिल्लीचा ‘ई-आयसीयू’ कार्यक्रम केंद्र-राज्य सहकार्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्याचा उद्देश मृत्युदर कमी करण्याचा आहे. आठवड्यातून दोनदा आयोजित या ‘टेलि-कन्सल्टेशन’ सत्रांमुळे अति दक्षता विभागातील रूग्णांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञांच्यासमान अनुभव व तांत्रिक सल्ल्याद्वारे राज्यातील मोठ्या कोविड-१९ रुग्णालयांना मार्गदर्शन व आधार मिळत आहे. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे व मृत्यू प्रकरणांची संख्या सतत कमी होत आहे, जी सध्या २.४१% आहे.


Previous Post

कॅगच्या प्रांगणात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group