पुणे – जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथ मारुती पवार यांचे निधन झाले. जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी झटणारा, विकासकामांचा सातत्यानं पाठपुरावा करणारा धडाडीचा सहकारी आम्ही गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जुन्नर तालुक्यातल्या अनेक संस्था, संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले.