India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कटिबद्ध व्हा

India Darpan by India Darpan
July 27, 2020
in Uncategorized
0

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे आवाहन

मुंबई ः महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची स्वबळावर सत्तास्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सोमवारी केले.

प्रदेश भाजप कार्यसमिती बैठकीत बोलताना मा.नड्डा यांनी हे आवाहन केले. व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश तसेच राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नड्डा म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत सक्षमतेने हाताळली. लॉक डाऊनचा निर्णय वेळेत घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने अत्यंत प्रगत असलेले अमेरिका व युरोपातील देशांना लॉक डाऊन चा निर्णय वेळेत घेता न आल्याने या देशातील बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.

अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मोदी सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा लाभ समाजातील अनेक वर्गांना झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्योग, कृषी या सारख्या विविध क्षेत्रांना या पॅकेजचे फायदे पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहचवली पाहिजे, असेही मा.नड्डा यांनी सांगितले.

नड्डा यांनी सांगितले की, कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचे हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेपुढे प्रभावीपणे मांडले पाहिजे. या पुढील काळात कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे. भविष्यात राज्यात स्वबळावर सत्तेत आणण्याचा निर्धार करून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मा.नड्डा यांनी लॉकडाऊन काळात पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवा कार्याची प्रशंसा केली.


Previous Post

कोरोनाच्या काळात अधिका-यांनी केलेले कार्य अभिनंदनीय

Next Post

खाकी वर्दीतील ‘माणुसकी’

Next Post

खाकी वर्दीतील ‘माणुसकी’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खासदार उदयनराजे संतापले आणि करुन टाकली ही मोठी घोषणा…

March 27, 2023

सुवर्णपदक विजेत्या लोव्हलिना बोरगोहेन अशी बनली बॉक्सर… या एका घटनेने दिली कलाटणी…

March 27, 2023

महागावच्या शेतकऱ्यांच्या गटाची यशोगाथा… सर्व सभासदांना असे केले स्वावलंबी….

March 27, 2023

तरुणांनो, लागा तयारीला! पिंपरी-चिंचवड महापालिकेत तब्बल १६ हजार पदांसाठी भरती; येथे करा अर्ज

March 27, 2023

CBIने सापळा रचला… ५ लाखाची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले… मग अधिकाऱ्याने…

March 27, 2023

अभिनेत्रीने या वयात कुटुंबाला दिली ‘गुडन्यूज’

March 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group