India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

India Darpan by India Darpan
August 12, 2020
in Uncategorized
0

मुंबई – धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना भयानक आहे. मुली, महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयश आल्याने महाआघाडी सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,  अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

वाघ म्हणाल्या की, कोरोना महामारीशी सामना करत असताना राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलींसह महिलांवरील अत्याचारांच्या घटनांतही मोठी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याआधी वर्धा, रोहा, चंद्रपूर, पुणे, जळगाव या ठिकाणीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. विलगीकरण केंद्रातही महिला सुरक्षित नाहीत. माध्यमांतून वारंवार या घटना समोर येत असताना राज्य सरकार मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. महिला सुरक्षे संदर्भात संवेदनहीन असलेल्या या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

सत्तेवर आल्यावर गृहराज्यमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत ‘दिशा’ कायद्यांची चर्चा केलेली. मात्र ही चर्चा केवळ कागदावरच राहिली आहे. कोणतेही प्रश्न आल्यावर सरकार कोरोना संकटाचे निमित्त पुढे करते. या काळात अनेक शासकीय निर्णय घेतले गेले. मग महिला सुरक्षे संदर्भात निर्णय घेण्यास एवढी दिरंगाई या सरकारकडून का केली जाते आहे असेही वाघ यांनी पत्रकात म्हटले आहे.


Previous Post

विक्रमी अन्नधान्य वाटप

Next Post

पेस्ट कंट्रोल ठेक्याबाबत चौकशी करून कारवाई करा; युवक राष्ट्रवादीची मागणी

Next Post

पेस्ट कंट्रोल ठेक्याबाबत चौकशी करून कारवाई करा; युवक राष्ट्रवादीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group