येवला : भाविकांसाठी मंदिरे खुले करा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. सदर घंटानाद आंदोलनात नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगरसेवक प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापू गाडेकर, सुकृत पाटील, राधेश्याम परदेशी, कुणाल क्षिरसागर, मनोज दिवटे, राजू परदेशी, किशोर परदेशी, सुनील बाबर, कुंदन हजारे, पंकज पहिलवान, विशाल काथवटे, बाबू खानापुरे, सुजित खानापुरे, बाळू साताळकर, किरण कायस्थ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक सहभागी झाले होते.