येवला – मुंबईची तुलना थेट पाकव्यक्त काश्मिरशी केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहे. येवल्यातही शिवसेनेने बाॅलीवुड अभिनेत्री कंगणा राणावत हिचा निषेध करत शनी पटांगण येथे जोडे मारो अंदोलन केले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संभाजीराजे पवार,तालुका प्रमुख रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड, शिवसेना नगरसेविका तथा महिला आघाडीच्या अध्यक्ष सरोजनीताई वखारे, येवला नगरपालिकेचे शिवसेना गटनेते दयानंद जावळे, किशोर सोनवणे, शहर संघटक राहुल लोणारी, चंद्रमोहन मोरे, धिरज जावळे, चंद्रकांत शिंदे, भागवत जाधव, साहेबराव बनकर, ज्ञानेश्वर वखारे,लक्ष्मण पवार, सुखदेवबाबा भोरकडे उपस्थित होते