येवला : शिव सेवा फाउंडेशन अंतर्गत शिवसेवा करिअर अकॅडमीचा उद्घाटन सोहळा येथील बनकर पाटील शैक्षणिक संकुलात संपन्न झाला. तहसीलदार रोहिदास वारूळे यांचे हस्ते अकॅडमीचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक प्रवीण बनकर, प्राचार्य जयप्रकाश कोकणे, प्राचार्य निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपक मढवई यांनी तर आभारप्रदर्शन संजय करंजकर यांनी केले. कार्यक्रमास शिवसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष कुणाल भावसार, उपाध्यक्ष संजय करंजकर, अंकुश गाढवे, मेजर गोविंद पंचमढे, राजेंद्र गणोरे, दीपक मढवई, संदीप उकिरडे पाटील, चेतन सूर्यवंशी, बाळासाहेब गाडे, स्वप्नील वाघ, दीपक जाधव, अमोल वाघ आदी उपस्थित होते.