India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

युपीएससी निकालात मराठी झेंडा; महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

India Darpan by India Darpan
August 5, 2020
in राष्ट्रीय
0
साभार - नवोदया टाइम्स

साभार - नवोदया टाइम्स


केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
नवी दिल्‍ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण ८२९ यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून अभिषेक सराफ हा प्रथम तर नेहा भोसले दूसऱ्या
क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे ८ आणि १५ व्यास्थानावर आहेत.केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०१९ च्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात  पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील ५ उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानूक्रमे ८ व्या स्थानावर अभिषेक सराफ, नेहा भोसले १५ व्या स्थानावर, मंदार पत्की २२ व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी ४४ व्या स्थानावर, योगेश पाटील ६३ व्या स्थानावर, विशाल नरवाडे ९१ व्या स्थानावर, आहेत. दिव्यांगामधून राज्यातील जयंत मंकले हे १४३ व्या स्थानावर आहेत.
जयंत मंकलेंची अंधत्वावर मात 
पुण्याचा जयंत मंकले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष २०१९ च्या परीक्षेत १४३ क्रमांक मिळविला आहे. या आधी जयंत ने २०१८ मध्ये ही लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्यावेळी त्याचा क्रमांक ९३७ होता. यावेळी पुन्हा प्रयत्न करित १४३ वा क्रमांक मिळविला.महिला उमेदवारांनीची बाजी
यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील १२ महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार १५ वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (१३७), अश्विनी तानाजी वाकडे (२००), गौरी पुजारी (२७५), नेहा किरडक (३८३), डॉ.प्रणोती संजय
संकपाल (५०१), अंकिता अरविंद वाकेकर (५४७), पुनम प्रकाशराव ठाकरे (६४१), प्रियंका कांबळे (६७०), प्रज्ञा खंडारे (७१९), अनन्या किर्ती (७३६).
एक नजर निकालावर
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण ८२९ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून ३०४, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) ७८, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) २५१, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) १२९, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ६७ उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ६० शारीरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.
लोकसेवा आयोगाने १८२ उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट ९१, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ९, इतर मागास वर्ग ७१, अनुसूचित जाती ८, अनुसूचित जमाती ३ उमेदवारांचा समावेश आहे.यांनी मिळविले यश
अभिषेक सराफ (8), नेहा प्रकाश भोसले (15), मंदार जयवंतराव पत्की (22), आशुतोष कुलकर्णी  (44), दिपक करवा (48),  योगेश अशोकराव पाटील (63), विशाल तेजराव नरवडे (91), मयुर खंडेलवाल (106), राहूल लक्ष्मण
चव्हाण (109), विनोद पाटील (132), कुलदिप जंगम (135), नेहा दिवाकर देसाई (137), जयवंत किशोर मनकाळे (143), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (151), शेख मोहमद झेब झाकीर (153), अश्विनी तानाजी वाकडे (200), सागर भारत मिसाळ (204), माधव विठ्ठलराव गित्ते (210), कुणाल मोतीराम चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमित महाजन (214), श्रेणिक लोढा (221), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), आयुष खरे (267), गौरी पुजारी (275), गजराज बच्छावत (277), शंतनु अत्रे (281), प्रसाद शिंदे (287), रजनिश पाटिदार (307), आकाश अग्ले (313), मंदार देशपांडे (334), रजत उभयकर (378), आदित्य काकडे (382), नेहा किरडक (383), निमिश पाटील (389), महेश गिते (399), अभिषेक शिवहरे (414), कांतीलाल सुभाष पाटील (418), अमित कुमावत (423), अविनाश जगधवर (433), परमानंद प्रविण दराडे (439), स्वप्नील पवार (448), ऋषिकेश जयसिंग देसाई (481), नकुल राजेंद्र देशमुख (489), शुभ्रमण्य भालचंद्र केळकर (497), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), सुमित कैलास जगताप (507), दिपक धनखेर (520), प्रसन्न लोढा (524), नवनाथ शिवाजी माने (527), प्रफुल्ल देसाई (532), वैभव हिरवे (541), अंकिता अरविंद वाकेकर (547), विजयसिंहराव साहेबराव गिते (550), समिर प्रकाश खोडे (551), सुरेश कैलासराव शिंदे (574), अभिनव प्रविण इंगोळे (624), अजय गणपती कुंभार (630), स्वप्नील जगन्नाथ पवार (635), अभिषेक दिलीप दुधाळ (637), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), अशित कांबळे (651), करूण गरड (656), प्रियंका कांबळे (670), ऋषिकेश देशमुख (688), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकटे (710), प्रज्ञा खंडारे (719), साकेत धवने (727), निखिल दुबे (733), राजीव मेश्राम (735), अनन्या किर्ती (736), शशांक माने (743), निखील कांबळे (744), सुमित रामटेके (748), शुभम भैसारे (749), निलेश गायकवाड (752), कुणाल उत्तम शिरोटे (765), वैभव वाघमारे (771), अश्विन गोलपकर (773), विधित्या नायक (780), किशोर सुत्रधार (784), सरगम शिंदे (785), सर्वेश सोनवाणी (787), अजिंक्य विद्यागर (789), सत्यजित यादव (801), समिर महाजन (810), सुनिल शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दिक्षित (827).यापैकी यशस्वी झालेल्या ६६ उमेदवारांची निवड तात्पुरती आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

(टिप : राज्यनिहाय यादी जाहीर होत नसल्यामुळे काही नावे सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही)


Previous Post

कोविड रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलला संरक्षण द्या, सीटूची मागणी

Next Post

चीनने सीमेवर जमवली अण्वस्त्रे; भारतावर दबाव वाढविण्यासाठी खेळी

Next Post
फोटो - इंडिया टूडे आणि कर्नल विनायक भट यांच्या ट्विटर हँडलच्या सौजन्याने

चीनने सीमेवर जमवली अण्वस्त्रे; भारतावर दबाव वाढविण्यासाठी खेळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group