India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोफत सल्ला, समुपदेशन अन् मदतही!

India Darpan by India Darpan
July 28, 2020
in संमिश्र वार्ता
0

महापालिका, सायकॅट्रीक सोसायटी व भोसला कॅम्पसचा पुढाकार
नाशिकः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाज कधी नव्हे एवढा चिंताक्रांत बनला आहे. आपल्यालाही स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी वाटणे स्वभाविक आहे. पण या काळजीचे रूपांतर अवास्तव चिंता किंवा भीतीमध्ये होत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. झोप न येणे,एकटे वाटणे,निराश वाटणे,आयुष्य संपविण्याची मनात इच्छा होणे,हदयात धडधड सुरु आहे असे वाटणे, सध्या यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बाबींचे वेळीच मोफत निराकरण,समुपदेशन करण्यासाठी नाशिक महापालिका, भोसला कँम्पस आणि नाशिक सायकॅट्रीक सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
   या तिन्हीमध्ये एका बैठकीत नुकताच करार झाला. ‘मनोधर’च्या माध्यमातून अशा व्यथीत व्यक्ती,कुटूंबाना मोफत हेल्पलाईद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे,  आपणाला सकाळी दहा ते सांयकाळी सहा यावेळेत मोबाईल ९६०७५३२२३३ आणि ९६०७७३५१३२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
या करारावर महापालिकेकडून आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके, नाशिक सायकॅट्रीक सोसायटीचे डॉ.उमेश नागापूरकर आणि भोसला मिलीटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ.यु.वाय.कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली.या उपक्रमासाठी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तीन महिन्यांसाठी असणारा हा करार भविष्यात गरजेनुसार पुढे वाढू शकतो अथवा संपुष्टातही येऊ शकतो, मात्र हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असेल. या करारात तिन्ही संस्थाची जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कामाचे सुक्ष्म नियोजन झाले., त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग हा या कार्यात सहभागीं होणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणे,
लोकांच्या प्रबोधन,प्रोत्साहनासाठी नाशिक सायकॅट्रीक सोसायटीच्या मदतीने मोठ्या संखयेने छोटे छोटे ध्वनीसंदेश तयार करणे,ध्वनी-चित्रफितसंदेशातून माहिती पोहचविण्याचे काम करणे, याशिवाय कोरोनाग्रस्त रूग्य, वैयक्तीकत्रस्त झालेले किंवा आढळलेल्या नमून्यांमुळे तणावाखाली असलेल्यांना नाशिक सायकॅटीक सोसायटीकडे( मानसोपचार तज्ञ,डॉक्टर) पाठवणे,समाजात तणावरहित आणि आरोग्यसाठी पोषण उत्साही वातावरण तयार करण्यासाठी काम करण्याचे ठरले. सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह हेमंत देशपांडे,डॉ.भरत केळकर,महापालिका नोडल ऑफिसर डॉ.आवेश पलोड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे.
डॉ.भरत केळकर,नो
———
व्हिडीओ मिटींग अँप आणि समुपदेशन
या प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या लोकांना नाशिक सायकॅट्रीक सोसायटीकडून व्हिडीओ मिटींग अँपच्याद्वारे प्रशिक्षण देणे,सेलकडे थेट वैयक्तीक संपर्क साधणारे अथवा इतरांच्या माध्यमातून येणाऱ्या रूग्णांचे समुपदेशन करणे, या संसर्गाच्या काळात आत्महत्येसारख्या प्रकारांना प्रतिबंध बसावा तसेच समाजातील वातावरण हे उत्साही आणि आरोग्यदायी रहावे यासाठी ध्वनी अथवा चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोसायटीची असेल.
———————-
चौकट
हेल्पलाईनद्वारे महत्वपूर्ण मदत
भोसला कॅम्पसचाही या प्रकियेत प्रमुख सहभाग असेल. मानसिक आणि भावनिकदृष्टया त्रस्त असणाऱ्यांना ओळखून त्यांना सेल,हेल्पलाईनद्वारे त्वरीत मनुष्यबळ उपलब्ध करूने देणे,सेल आणि हेल्पलाईनद्वारे आलेल्या सर्व बाबींच्या नोंदी ठेवणे,रूग्णांची गरज व आवश्यकतेनुसार नाशिक सायकॅट्रीक सोसायटीकडे पाठवणे त्तात्काळ सेवेसाठी लोकांना आवाहन करून वाहने उपलब्ध करून देणे या कामांबरोबरच समन्वय साधण्याची महत्वपुर्ण जबाबदारी भोसला कँम्पसवर देण्यात आली य़ाहे. या तिन्ही संस्थांद्वारे सेल,हेल्पलाईनच्या माध्मातून आगामी काळात नाशिककरांना तात्काळ मदत,समुपदेशाबरोबरच प्रबोधन,जनजागृतीचे महत्वपूर्ण काम होईल. यामुळे कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत नाशिककरांना निश्चित दिलासा मिळेल यात शंका नाही.

Previous Post

पाल टाकून राहणाऱ्या भटक्यांची माहिती संकलित करा

Next Post

इयत्ता दहावीचा निकाल उद्या

Next Post

इयत्ता दहावीचा निकाल उद्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group