सटाणा – मेव्हण्याने आपल्याच मेव्हणीचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील पिंगळवाडे येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर जायखेडा पोलिसांनी मेव्हण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जायखेडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळवाडे येथे वास्तव्यास असलेल्या महिलेस वसंत जगन्नाथ अहिरे (रा. आराई ता.सटाणा) याचा मेव्हणी सोबत वाद झाला. त्यानंतर अहिरे याने मेव्हणीचे केस पकडले. ‘तू येथे व्यवसाय करते, असे अश्लिल भाषेत बोलून संबंधित महिलेस लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ‘तू माहेरी राहू नकोस. तुझ्या नवर्याकडे निघून जा’ असे बोलून हाताने मारहाण केली. तसेच ‘तू येथे राहिलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशी दमदाटीही केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक भोये करीत आहेत.