नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोड आणि मानेनगर भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मानेनगर भागात राहणारे विकास संतिश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोनवणे कुटुंबिय ५ ते ९ मे रोजी बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सात हजाराची रोकड व सोनसाखळी असा सुमारे ३८ हजार ९०० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
दुसरी घटना पेठरोडवरील एसटी वर्कशॉप समोर राहणा-या सुनिता नामदेव भोये (रा.राजमान्य हौ.सोसा.) यांनी फिर्याद दिली आहे. भोये कुटुंबिय २५ एप्रिल ते १० मे दरम्यान आपल्या मुळगावी गेलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे टॉप्स व चांदीचा कॉईन असा सुमारे ३४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण व जाधव करीत आहेत.
३८ वर्षीय विवाहीतेची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड भागात राहणा-या ३८ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनाली आनंद त्रिभुवन (रा.ख्रिश्चन कॉलनी,डिसूझा रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. सोनाली त्रिभुवन यांनी शनिवारी (दि.१०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती आनंद त्रिभुवन यांनी त्यांना बिटको हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हिवाळे करीत आहेत.