India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

‘मिशन झिरो’ मध्ये सापडले ३१०० कोरोना बाधित; आतापर्यंत २७ हजार चाचण्या

India Darpan by India Darpan
August 12, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – महानगरपालिका, भारतीय जैन संघटना,  वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे वतीने  सुरु करण्यात आलेल्या “मिशन झिरो नाशिक” या एकात्मिक कृती योजनेत १९ व्या दिवशी १ हजार ४१८ नागरिकांनी आपल्या अँटीजेन चाचण्या करून घेतल्या. त्यापैकी १८६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत १९ दिवसात २७ हजार ७५४ अँटिंजेन चाचण्या करण्यात आल्या असून त्यात ३ हजार १६४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात यश येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधून काढणे, लगेच उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे यामुळे सदरील रुग्ण लवकर बरे होऊन त्यांना शारिरीक व मानसिक बळ देण्यात तसेच पुढील होणारे संक्रमणही थांबविण्यात “मिशन झिरो नाशिक” अभियानाला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे, अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला यांनी दिली आहे.
२५ मोबाईल व्हॅन
मनपाच्या सहाही विभागातील विविध परिसरातून २५ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात, फिल्डवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. मिशन झिरो नाशिक करिता २२५ च्यावर कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत रॅपिड अँटिंजेन टेस्ट चाचण्या करून घ्याव्यात.  तसेच आवश्यकेनुसार मोफत आरटी पीसीआर चाचणी करिता समाज कल्याण वसतिगृह नासर्डी पुलाजवळ, नवीन बिटको रुग्णालय नाशिक रोड, पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कंपाउंड येथे रुग्णांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्लाझ्मा दानसाठी
प्लाझ्मा डोनर्स जीवनदाता योजनेअंतर्गत कोरोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे येत असून संमती पत्रे भरून देत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या १८ ते ५५ वयोगटातील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतर कोरोना बाधित रुग्णांना दिला जातो व त्याद्वारे सदरील रुग्ण ही कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होतात. प्लाझ्मा दान संमती पत्रे भरून देण्यासाठी कृपया ८६६९६६८८०७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन बीजेएसचे  दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, विजय बाविस्कर,प्रा. प्रशांत पाटील , सचिन जोशी, यतिश डुंगरवाल, गोटू चोरडिया, ललित सुराणा, रोशन टाटिया, संदिप ललवाणी, डॉ.उल्हास कुटे, डॉ. भागवत सहाणे  यांनी केले आहे.
यांचे अनमोल सहकार्य
आजच्या मिशन झिरो नाशिक मध्ये महानगरपालिका चे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते यांच्या बरोबरीने सैफी ऍम्बुलन्स कॉर्पस चे सेवाभावी कार्यकर्ते, गुरुद्वारा नाशिकरोड,किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल ,एस के डी इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी ,साधना फाऊंडेशन , मातोश्री ट्रॅवल्स ,एस्पिलियर स्कूल,  डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व  राजकीय कार्यकर्ते अश्या अनेक संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य लाभत आहेत.

Previous Post

सप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता; या पद्मश्री डॉक्टरांनी दिली माहिती

Next Post

जन्माष्टमी विशेष! इस्कॉन मंदिरातील आजची ही कृष्णरुपे

Next Post

जन्माष्टमी विशेष! इस्कॉन मंदिरातील आजची ही कृष्णरुपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group