Last updated on August 8th, 2020 at 08:55 am
मालेगाव – अगोदरच कोरोनामुळे भीतीचे वातावरण असलेल्या मालेगाव येथे शासकीय नर्सिंग कॅालेजमध्ये बुधवारी सकाळी इंडियन कोब्रा विद्यार्थींनींना दिसला. या कोब्रामुळे सर्वच घाबरले. त्यानंतर सर्पमित्र नितीन सोनवणे यांना बोलावण्यात आले. त्यांनी २० मिनीटातच कोब्राला पकडले व सुरक्षितस्थळी सोडून दिले. साडेचार फुट लांबीचा असलेला हा कोब्रा सर्वात विषारी असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.