नाशिक – मानव-वन्यजीव संघर्ष हा प्रश्न सर्वत्र उग्ररूप धारण करीत असून, त्यामुळे वन्यजीव वनसंवर्धन, आणि मानवी जीवन या सर्वां समोरच गंभीर संकट निर्माण झाले आहे. या सर्व प्रश्नांचा वेध घेऊन त्यावर काय उपाय योजना करता येईल, याविषयीचे मार्गदर्शन येत्या रविवारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजता वेब संवाद मध्ये करण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि त्या सभोवतालच्या वन क्षेत्रात कार्य करणाऱ्या वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्र वन्यजीव मंडळाच्या सदस्य पुनम धनवटे मार्गदर्शन करणार आहेत. या संवादात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक राजेंद्र नन्नावरे यांनी केले आहे.
अर्चना: ८८३०७६८१२०
राहुल: ९२७००७६५७८
संदीप: ९९६०४३७१८२