India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महिला सुरक्षेसाठी आता ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ ॲप

India Darpan by India Darpan
August 15, 2020
in राज्य
0

मुंबई – बदलत्या परिस्थितीत महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर झाला पाहिजे. स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर महिला करत आहेत तेव्हा ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेब ॲप म्हणजे महिलांची सुरक्षा त्यांच्या हातात उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम असून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मदत मिळवून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

महिला व बाल विकास आयुक्तालय, अक्षरा संस्था आणि टाटा सामाजिक संस्था संचलित महिला विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ या वेबॲपचे अनावरण ॲड.ठाकूर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास उपायुक्त दिलीप हिवराळे, ‘अक्षरा’ संस्थेच्या सहसंचालिका नंदिता गांधी, नंदिता शाह, टाटा सामाजिक संस्था महिला विशेष कक्षाच्या तृप्ती झवेरी- पांचाळ, राज्यातील संरक्षण अधिकारी, महिला विशेष कक्षांचे अधिकारी, समुपदेशक उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या की, लॉकडाऊनमधे जनजीवन ठप्प असताना संपूर्ण जगात महिलांवरचे अत्याचार, हिंसाचाराच्या घटना वाढल्या ही वस्तुस्थिती आहे. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षा मिळवून देणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही आपली प्राथमिकता होती. शासनाची यंत्रणा, हेल्पलाईल क्रमांक महिलांना मदत करत आहेतच, यासोबत ॲप सारख्या माध्यमातून महिलेच्या घरात, हातात जर सुरक्षेचे साधन देता आले तर नक्कीच अनेक घटनांना आळा बसेल असा विचार समोर आला. यादृष्टीने या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपल्या राज्यातला असा पहिलाच प्रयत्न असल्याचे सांगत ‘अक्षरा’ संस्थेचे तसेच महिला व बाल विकास विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या टाटा सामाजिक संस्थेचे त्यांनी आभार मानले. महिलांनी व्यक्त व्हावे, अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन करत एकत्रित प्रयत्नांनी हिंसाचाराच्या घटना रोखता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

असे आहे अॅप

‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ हे वेबॲप असून https://standupagainstviolence.org/maharashtraApp/index.html या वेबपत्त्यावर क्लिक करून मोबाईलच्या होमस्क्रीनला जतन करता येईल. या ॲपमधे जिल्हावार माहिती संकलित करण्यात आली असून वापरकर्त्या महिलेने आपला जिल्हा निवडल्यानंतर त्यांना तात्काळ मदत करु शकणारे समाजसेवक, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, वन स्टॉप सेंटर, निवारागृह, महिला विशेष कक्ष यांचे संपर्क क्रमांक मिळणार असून ॲपद्वारेच त्यांना दूरध्वनी करता येईल. यात मदत मिळाली नाही, संपर्क होऊ शकला नाही तर तसा अभिप्रायही नोंदवता येईल. अभिप्राय नोंद केल्यास त्याची तातडीने दखल घेतली जाईल. सध्या इंग्रजीमधे असलेले ॲप लवकरच मराठी भाषेतही उपलब्ध असेल.


Previous Post

जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

Next Post

न्यायालयाच्या निकालानंतर अखेर या अंतिम वर्ष परीक्षेच्या तारखा जाहीर

Next Post

न्यायालयाच्या निकालानंतर अखेर या अंतिम वर्ष परीक्षेच्या तारखा जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंबड पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

June 8, 2023

तब्बल ११ दुकाने फोडणारा जेरबंद… नाशिक पोलिसांची कामगिरी… या गुन्ह्यांची उकल

June 8, 2023
प्रातिनिधिक फोटो

मोबाईल चोरणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी लावला छडा…. तिघे गजाआड… ४० मोबाईल हस्तगत…

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने घेतला गळफास… सातपूर परिसरातील घटना

June 8, 2023

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; बघा, तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

नव्या पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांवर काय लिहायचं? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group