India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा लेख

India Darpan by India Darpan
August 1, 2020
in विशेष लेख
0

आपले आर्थिक वर्ष जरी एक एप्रिल रोजी सुरू होत असले तरी शेतीचे वर्ष निसर्ग चक्राप्रमाणे एक ऑगस्टला सुरू होते व शेतीशी घट्ट नाते असलेल्या महसूल विभागाचे नवीन वर्ष सुद्धा एक ऑगस्ट रोजी सुरू होते. एक ऑगस्ट हा दिवस संपूर्ण राज्यात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.
महसूल विषय कामे सांभाळत असतानाच इतर सर्वच विभागांचा समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवली गेलेली असल्यामुळे महसूल विभागास शासनाचा कणा समजले जाते. काम भलेही कोणत्याही विभागाकडचे असो तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांचे लक्ष त्याकडे वेधले तर ते होऊ शकेल हा विश्वास तळागाळापर्यंत आजही टिकून राहिला आहे हे श्रेय या विभागात रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे आहे.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि आनंदाच्या प्रसंगापासून ते आपत्तीच्या प्रसंगापर्यंत प्रत्येकच बाबतीत शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने महसूल विभागाशी सर्वांचा कायमच संबंध येतो. जमीन विषयक संपूर्ण कामकाज, सामाजिक न्याय न्याय विषयक सहाय्य, कायदा आणि सुव्यवस्था , दंडाधिकारी अधिकारातील विविध दाखले, निवडणुकीचे कामकाज, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा अशा व इतर अनेक बाबींची हाताळणी आपल्या विभागामार्फत होते.
नैसर्गिक आपती, ज्यात दुष्काळ, अतिवृष्टी, अपघात किंवा सांसर्गिक आजार अशा विविध बाबींचा समावेश होतो, त्याचे व्यवस्थापन अतिशय प्रभावी रीत्या आपल्या विभागाकडून होते. जसे आता कोरोना संकटात संपूर्ण महसूल विभाग आपली सेवा एखाद्या योध्याप्रमाणे बजावत आहे.
शेतकरी आत्महत्या, शेतकरी अपघात प्रकरणात कार्यवाही करणे, लोकशाही दिनामध्ये नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेऊन संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून निराकरण करणे असो की लोकसभेपासून ते अगदी जिल्हा सहकारी बँक अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असो अशा सर्व जबाबदाऱ्या आपले अधिकारी व कर्मचारी संयमाने आणि कौशल्याने पार पाडतात.
महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण प्रकल्प आपण सर्व अडचणींवर मात करून पूर्णत्वास नेला आहे.
आपल्या विभागात विविध प्रकारची न्यायिक प्रकरणे चालवली जातात. भावकीतील वाद असो की गरीब श्रीमंतांमधील वाद आपल्या महसुली न्यायालयात हजारो संख्येने वाद-विवाद दरवर्षी निर्णायक पद्धतीने मिटवले जातात.
महापुरुषांची जयंती पुण्यतिथी , मिरवणूका तसेच इतर धार्मिक व सामाजिक उत्सवासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या विभागाला काम करावे लागते. महसुली कर्तव्याशिवाय शेकडो प्रकारची अतिरिक्त कामे आपल्या विभागाकडून विनातक्रार केली जातात. आपल्या यंत्रणेच्या कर्तव्यक्षमतेवर असलेला शासनव्यवस्थेचा विश्वास आपल्याकडून नेहमीच सार्थ ठरवला जातो ठरवला जातो.
अश्या ह्या महसूल विभागाचे आपण सर्वजण घटक आहोत याचा आपल्या सर्वांना निश्चितच अभिमान वाटायला हवा! अहर्निश सेवा देणाऱ्या माझ्या महसूल परिवारातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल- पोलीस पाटील बंधू भगिनी, सर्वांना मनपुर्वक शुभेच्छा!
सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)

Previous Post

नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध आंदोलन

Next Post

महसूल दिन – नाशिक जिल्ह्याचा आढावा

Next Post

महसूल दिन - नाशिक जिल्ह्याचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group