मुंबई – मराठा समाज आरक्षण आंदोलनातील मृत व्यक्तींच्या वारसांना १० लाख रुपये आर्थिक मदत आणि एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. गेल्या सरकारनेच यासंबंधीचा प्रस्ताव आणि निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.