गेल्या २४ तासांत ३ लाख ८१ हजार २७ चाचण्या पूर्ण झाल्या असून, दर दहा लाखांत १४ हजार ६४० इतका या चाचण्यांचा (IPM) वेग वाढला आहे. देशात सध्या दर दहा लाखांत १४ हजार ४६० इतक्या चाचण्या होत आहेत. देशातील चाचण्यांचा(TPM) वेग सातत्याने वाढत असताना २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात हा दर देशातील सरासरीपेक्षा जास्त आहे.
देशातील प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करण्यात येत असून देशात आता एकूण १३४८ प्रयोगशाळा असून त्यापैकी ९१४ सरकारी तर ४३४ खाजगी आहेत. त्यात
● रीअल टाईम आरटी पीसीआर आधारित प्रयोगशाळा: ६८६ (सरकारी ४१८ व खाजगी २६८)
● ट्रू नँट आधारित प्रयोगशाळा: ५५६ (सरकारी ४६५ व खाजगी ९१)
● सीबीनअँअँट आधारित प्रयोगशाळा: १०६ (सरकारी ३१ व खाजगी ७५)