Last updated on August 4th, 2020 at 10:45 am
नवी दिल्ली – देशातील प्रमुख आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पाच मोठे नेते कोरोना बाधित झाल्याचे दिसून येत आहे. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे. या बड्या नेत्यांवर उपचार सुरू असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, पक्षाच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.