India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

भरमसाठ वीज बिलातून महावितरणचा महाघोटाळा

India Darpan by India Darpan
August 8, 2020
in Uncategorized
0

भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचा आरोप

मुंबई – महावितरणने राज्य सरकारच्या मान्यतेने भरमसाठ रकमेची बिले पाठवून सामान्य माणसाच्या पैशावर डल्ला मारला आहे. महावितरणची आर्थिक गरज भागविण्यासाठी केलेला हा घोटाळाच आहे, असा आरोप भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘महावितरणचा काला चिठ्ठा’  या महावितरणच्या घोटाळ्यावर आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून राज्य सरकार हे प्रत्येक विषयात चालढकल कशी करता येईल याचाच विचार करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार निरंजन डावखरे, सरचिटणीस श्रीकांत भारतीय व माजी आमदार राज पुरोहित उपस्थित होते.

सोमैय्या म्हणाले की, कोरोना काळात सरासरी वीजबिल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केलेला मात्र प्रत्यक्षात फक्त एप्रिल, मे आणि जून मध्ये सरासरी बिले दिली. जुलै महिन्याचे प्रत्यक्ष रिडींगनुसार बिले देणार असे सांगून तब्बल दुप्पट-तिप्पट किंमतीची वाढीव बिले वाटली गेली. महावितरणला त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी आणि विद्युत पुरवठा सुरू ठेवण्यासाठी २० हजार कोटी रूपयाची आवश्यकता होती. राज्य सरकारने हतबलता दर्शवल्यामुळे मंत्रालयामध्ये बसून सामान्यांची अशा वाढीव बिलांच्या रूपाने लूट करण्याचा निर्णय खुद्द राज्य सरकारनेच घेतला. जवळपास १ लाखाहून अधिक ग्राहकांना ५ हजार युनिटपर्यंत वाढीव रिंडींग दाखवून वाढीव वीजबिल दिल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांना वाढीव बिल दिल्याचे आणि त्यात सुधारणा केल्याचे महावितरणने मान्य केले असेही त्यांनी नमूद केले.

राज्य सरकारने जुलै महिन्यात करण्यात आलेल्या रिडींगला स्थगिती द्यावी, जुलै महिन्याची बिले मागे घ्यावीत, कोरोना काळात केलेली २० ते २२ टक्के दरवाढ रद्द करावी व वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ द्या, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई, महामुंबई अशा राज्याच्या सर्व भागातून वाढीव वीजबिलांचे १०० नमुने गोळा केलेले ‘महावितरणचा काला चिठ्ठा’ उर्जामंत्र्यांना पाठवणार असून राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार असल्याची माहिती सोमैय्या यावेळी दिली.


Previous Post

हॉटेलमध्ये न जाता घरी गेले अन गुन्हा दाखल झाला

Next Post

ई कोर्ट सुरु झाल्याने बार कौन्सिलची अनोखी योजना

Next Post

ई कोर्ट सुरु झाल्याने बार कौन्सिलची अनोखी योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group