India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बोपेगाव कोविड सेंटरमध्ये सुविधांची वानवा; खासदार डॉ. पवारांकडून पाहणी

India Darpan by India Darpan
August 25, 2020
in संमिश्र वार्ता
0

दिंडोरी – तालुक्यातील बोपेगाव कोविड सेंटरमध्ये अनेक सुविधांची वानवा असल्याचे समोर आले आहे. या सेंटरला खासदार डॉ. भारती पवार यांनी भेट दिली आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली.
पाहणीनंतर डॉ. पवार यांनी सांगितले आहे की, ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता बोपेगाव येथील शासकीय आश्रमशाळा येथील कोविड सेंटरला भेट दिली. याठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकेची गरज आहे. तसेच, डॉक्टर आणि आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांचीही कमतरता आहे. उपचारासाठी दाखल रुग्णांना सकस आहार, योगा शिक्षक, स्टीमर यांचीही आवश्यकता असल्याचे दिसून आले. तसेच वणी येथे डी.सी. एच सेंटर असतांनाही ते कार्यान्वित नाही. त्यामुळे रुग्णांना  इमर्जन्सी सेवा मिळण्यास अडचण येऊ शकते, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
बोपेगावच्या कोविड सेंटरला रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर, स्टीमर, डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांची नितांत आवश्यकता असल्याने जिल्हा वैद्यकीय अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पवार म्हणाल्या. कोविड सेंटरमधील रुग्णांशीही त्यांनी संवाद साधला. या भेटीप्रसंगी तहसीलदार कैलास पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. बागरेचा, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, भाजपा नेते प्रमोद देशमुख, संजय कावळे, विलास देशमुख, शहराध्यक्ष शाम मुरकुटे, योगेश बर्डे, तुषार वाघमारे आदी उपस्थित होते.

Previous Post

मांजरपाड्याच्या पाण्याने येवला, चांदवडचा दुष्काळ हटणार

Next Post

राजापूर येथे रानडुकरांकडून मका पिकांचे नुकसान

Next Post

राजापूर येथे रानडुकरांकडून मका पिकांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group